बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या मनात यायचा रोज आत्महत्येचा विचार, जाणून घ्या यामागचे कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 18:00 IST2020-04-14T17:54:09+5:302020-04-14T18:00:26+5:30
गेल्यावर्षी एका मुलाखती दरम्यान स्वत: हा खुलासा केला होता.

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या मनात यायचा रोज आत्महत्येचा विचार, जाणून घ्या यामागचे कारण
आपल्या मादक अदांनी चाहत्यांना रिझवणारी अभिनेत्री इलियाना डिक्रूज तिच्या बोल्ड लूकमुळे सतत चर्चेत असते. इलियाना बोल्ड फोटो शेअर करण्यात जराही कचरत नाही. लाखोंच्या संख्येने फॉलोव्हर्स आहेत.
गेल्यावर्षी एका मुलाखती दरम्यान इलियानाने सांगितले की, मी बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर आजाराने ग्रासली होती. यामुळे मी डिप्रेशनमध्ये गेली आहे. त्या काळात माझ्या मनात रोज आत्महत्येचे विचार यायचा. मी कायम माझ्या शरिराबद्दल विचार करायची आणि स्वत:तील कमतरता बघून निराश व दु:खी व्हायची. मला कुणीच स्वीकारणार नाही, असे मला कायम वाटत राहायचे. मी स्वत:ला स्वीकारणे सुरु केले आणि अर्धी लढाई जिंकली.
रुस्तम', 'रेड' अन् 'बर्फी' आणि 'बादशाहो'' यासारख्या सिनेमात काम केलेली इलियाना सध्या सिनेमातून गायब असली तरी तिने पुन्हा एकदा सर्वाचे लक्ष वेधून घेतले आहे.
इलियाना ऑस्ट्रेलियन फोटोग्राफर अँड्रयू निबोनसह रिलेशनशीपमध्ये होती. काही दिवसांनंतर त्यांच्यात खूप भांडण झाली. त्यानंतर त्यांनी वाद सोडवला नाही आणि ब्रेकअप केले. वर्कफ्रंटबद्दल इलियाना जॉन अब्राहमसोबत ‘पागलपंती’ या सिनेमात दिसली होती. या मल्टिस्टारर चित्रपटाकडून इलियानाला बºयाच अपेक्षा होत्या. हा सिनेमा दणकून आपटला आणि इलियानाचा अपेक्षाभंग झाला.