बॉडी शेमिंगबद्दल उघडपणे बोलली अजय देवगणची ही अभिनेत्री, म्हणाली-आरशात बघते आणि विचार करते
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2021 13:01 IST2021-03-06T12:52:20+5:302021-03-06T13:01:05+5:30
बॉलिवूडमधील बऱ्याच सेलेब्रिटींना अनेकवेळा सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं.

बॉडी शेमिंगबद्दल उघडपणे बोलली अजय देवगणची ही अभिनेत्री, म्हणाली-आरशात बघते आणि विचार करते
बॉलिवूडमधील बरेच सेलेब्रिटी बऱ्याचदा ऑनलाईन ट्रोल आणि बॉडी शेमिंगचा शिकार होतात. अभिनेत्री इलियाना डीक्रूज त्यापैकी एक आहे. अलीकडेच एका मुलाखती दरम्यान इलियाना डीक्रूज बॉडी शेमिंग आणि ट्रोलिंगबाबत उघडपणे बोलली.
हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना इलियाना डीक्रूज म्हणाली, "तुमची साईज काहीही असू देत, आपल्याला नेहमीच स्वत:मध्ये कमतरता दिसते. मी स्वतःला आरशात बघतो आणि निराश होते असे अनेकवेळा होते. आता मी स्वत: मध्ये एक पॉईंट घेऊन आरशात बघते आणि विचार करते स्वत: मधला असा कोणता फिचर आहे जो मला आवडतो आणि ज्यावर मी प्रेम करते. मला वाटते जे लोक नेहमी स्वत: मध्ये कमतरता शोधतात त्यानी हे एकदा ट्रॉय करायला हवं. इलियाना डीक्रूज बॉडी शेमिंगचा बळी ठरली आहे. अशा परिस्थितीत, ती बर्याचदा सकारात्मक पोस्ट्स शेअर करत असते आणि इतरांनाही प्रेरित करते.
वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर इलियाना 'अनफेयर अँड लवली' सिनेमाचे दिसणार आहे. या सिनमात इलियानासह रणदीप हुडाही झळकणार आहे. बलविंदर सिंह जंजुआ यांनी सिनेमाचे लेखन दिग्दर्शन केले आहे. सिनेमात इलियाना लव्हली नावाच्या मुलीची भूमिका साकारणार असून रणदीर हुडा पहिल्यांदाच विनोदी भूमिका साकारताना दिसणार आहे.
सिनेमाच्या टायटलवरून सिनेमाच्या कथा स्पष्ट होते. हरियाणामधल्या एका सावळ्या मुलीची ही कथा असून आपल्या या रंगामुळे तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, अशी गोष्ट आहे. इलियाना अजय देवगणसोबत बादशाहो आणि रेडमध्ये दिसली आहे.