"मी 'धुरंधर'सारखा सिनेमा कधीच बनवणार नाही...", बॉलिवूडच्या बड्या दिग्दर्शकाचं वक्तव्य, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 12:20 IST2025-12-31T12:18:44+5:302025-12-31T12:20:24+5:30
बॉलिवूडच्या बड्या दिग्दर्शकाने 'धुरंधर' बाबत मोठं वक्तव्य केलं आहे. 'धुरंधर'सारखा सिनेमा बनवणार नाही, असं वक्तव्य प्रसिद्ध दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनी केलं आहे.

"मी 'धुरंधर'सारखा सिनेमा कधीच बनवणार नाही...", बॉलिवूडच्या बड्या दिग्दर्शकाचं वक्तव्य, म्हणाला...
'धुरंधर' सिनेमाची क्रेझ काही केल्या कमी होत नाहीये. आदित्य धरचा सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवत असून प्रेक्षकांची मनंही जिंकत आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीही 'धुरंधर' सिनेमाचं कौतुक करत आहेत. पण, बॉलिवूडच्या बड्या दिग्दर्शकाने 'धुरंधर' बाबत मोठं वक्तव्य केलं आहे. 'धुरंधर'सारखा सिनेमा बनवणार नाही, असं वक्तव्य प्रसिद्ध दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनी केलं आहे.
श्रीराम राघवन सध्या त्यांच्या इक्कीस या सिनेमामुळे चर्चेत आहे. 'धुरंधर'प्रमाणेच हादेखील एक देशभक्तीपर सिनेमा आहे. त्यासोबतच श्रीराम राघवन यांनी एजेंट विनोदसारखा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. एजेंट विनोद आणि 'धुरंधर'च्या तुलनेवर श्रीराम राघवन म्हणाले, "हा एक चांगल्याप्रकारे बनवलेला सिनेमा आहे. ज्यामध्ये सगळ्यांनीच चांगलं काम केलं आहे. पण, आपण वेगळ्या काळात राहत आहोत. त्यामुळे हा आताच्या टाइपचा सिनेमा नाही, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. जेम्स बॉण्डचे सिनेमे तेव्हा मनोरंजक वाटायचे. पण आता ते सिरियस वाटतात. 'धुरंधर'देखील असाच एक सिनेमा आहे. हा चित्रपट चांगली कमाई करत आहे".
"पण, मी याच पद्धतीने सिनेमा बनवला तर तो मुर्खपणा ठरेल. कारण सध्या हा एकच प्लॅटफॉर्म नाही. आदित्य धरच्या सिनेमात एका वेगळ्या पद्धतीचा क्राफ्ट पाहायला मिळतो. मला त्याचे सिनेमे बघायला आवडतात. पण, मी अशा पद्धतीने सिनेमे बनवणार नाही", असंही पुढे ते म्हणाले. श्रीराम राघवन यांनी अंधाधुन, बदलापूर, एजेंट विनोद, मेरी ख्रिसमससारखे सिनेमे बॉलिवूडला दिले आहेत. त्यांचा इक्कीस सिनेमा १ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धात शहीद झालेल्या लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांच्यावर शौर्यकथेवर आधारित आहे.