IIFA Awards 2019: आयफा पुरस्कार सोहळ्यात यांनी मारली बाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 14:59 IST2019-10-21T14:56:22+5:302019-10-21T14:59:51+5:30
यंदाच्या 20 व्या आयफा सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे, यंदा हा सोहळा मुंबईत पार पाडला.

IIFA Awards 2019: आयफा पुरस्कार सोहळ्यात यांनी मारली बाजी
रविवारी रात्री आयफा पुरस्कार सोहळा रंगला. या पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. यंदाच्या 20 व्या आयफा सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे, यंदा हा सोहळा मुंबईत पार पाडला. मायानगरीत हा सोहळा होत असल्याने बॉलिवूड कलाकारांमध्ये अधिक उत्साह पाहायला मिळाला.
आयफा पुरस्कारात यांनी मारली बाजी
सर्वोत्कृष्ट चित्रपट
राजी
सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक)
अंधाधुन
सर्वोत्कृष्ट अभिनेता
रणवीर सिंग
(पद्मावत)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
आलिया भट
(राझी)
सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता
विकी कौशल
(संजू)
सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री
आदिती राव हैदरी
(पद्मावत)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
श्रीराम राघवन
(अंधाधुन)
सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्री
सारा अली खान
(केदारनाथ)
सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेता
इशान खट्टर
(धडक)
बॉलिवूडला दिलेल्या कॉन्ट्रीब्यूशनाठी कोरिओग्राफर सरोज खान यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांना माधुरी दिक्षितच्या हस्ते देण्यात आला.
या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन आयुष्मान खुराणा आणि त्याचा भाऊ अपारशक्ती खुराणा यांनी केले.