IIFA 2017: म्हणून आलिया भट्टने मनीष पॉलला या गोष्टीसाठी दिला नकार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2017 12:03 IST2017-07-15T06:33:25+5:302017-07-15T12:03:25+5:30
पुरस्कार सोहळे म्हटले की सेलिब्रिटींचे परफॉर्मन्स, एकमेकांची मजा मस्करी करणं हे आलंच. प्रत्येक पुरस्कार सोहळ्यात अनेक गंमतीशीर आणि लक्षवेधी ...

IIFA 2017: म्हणून आलिया भट्टने मनीष पॉलला या गोष्टीसाठी दिला नकार?
प रस्कार सोहळे म्हटले की सेलिब्रिटींचे परफॉर्मन्स, एकमेकांची मजा मस्करी करणं हे आलंच. प्रत्येक पुरस्कार सोहळ्यात अनेक गंमतीशीर आणि लक्षवेधी गोष्टी घडत असतात. यंदाचा आयफा पुरस्कार सोहळाही याला अपवाद नाही. या पुरस्कार सोहळ्यात अशीच एक आणखी गंमतीशीर घटना घडली. या पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री आलिया भट्ट हिला पुरस्कार जाहीर झाला. मात्र हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी ती उपस्थित नव्हती. मात्र एक पुरस्कार आलियाकडून देण्यात येणार होता. यावेळी मात्र आलिया उपस्थित होती. यामुळे सारेच जण चक्रावून गेले. पुरस्कार देण्यासाठी आलिया स्टेजवर आली आणि तिच्याकडून एखादा परफॉर्मन्स करुन घेतला जाणार नाही असं होईल का ? त्यामुळेच मनीष पॉल यानं आलियाकडे एक फर्माईश केली. मनीषने आलियाला ''लडकी कर गई चुल....'' या गाण्यावर थिरकण्याची फर्माईश केली. मात्र आलियानं याला नकार दिला. कारण पुरस्कार सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमात आलिया या गाण्यावर थिरकणार आहे. त्यामुळे मनीषला तिने नकार दिला. मात्र यानंतर रितेश देशमुख आणि मनीष या दोघांनीही आलियाला एकतरी परफॉर्मन्स देण्याची गळ घातली.यावेळी दोघांच्या आग्रहाला आलिया यावेळी नकार देऊ शकली नाही. तिने यावेळी एक रॅप करण्याचं मान्य केलं. यावेळी प्रसिद्ध रॅपर बादशाह याच्या लडकी..... या गाण्यावर आलिया थिरकली आणि उपस्थितही यावेळी भारावून गेले.