IIFA 2017: मनीष मल्होत्रासोबत आयफा सोहळ्यात असं घडलं की सारेच झाले अवाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2017 11:05 IST2017-07-15T05:25:59+5:302017-07-15T11:05:42+5:30
पुरस्कार सोहळे कायम या ना त्या गोष्टीमुळे चर्चेत असतात. तारे तारकांची हजेरी, त्यांचा स्टाईलिश अंदाज, रेड कार्पेटवरील त्यांची एंट्री ...

IIFA 2017: मनीष मल्होत्रासोबत आयफा सोहळ्यात असं घडलं की सारेच झाले अवाक
प रस्कार सोहळे कायम या ना त्या गोष्टीमुळे चर्चेत असतात. तारे तारकांची हजेरी, त्यांचा स्टाईलिश अंदाज, रेड कार्पेटवरील त्यांची एंट्री यामुळे पुरस्कार सोहळ्यांची जोरदार चर्चा होत असते. आपली सोहळ्यामधील उपस्थिती लक्षवेधी ठरावी अशी अनेक कलाकारांची इच्छा असते.त्यामुळे कलाकार मंडळी पूर्ण तयारी करुनच या सोहळ्यांमध्ये हजेरी लावतात.मात्र कधी कधी या पुरस्कार सोहळ्यात एखादी अशी गोष्ट घडते की ती ही रसिकांच्या लक्षात राहते.मग ती गोष्ट एखाद्या परफॉर्मन्समधील असावी,मग एखादा स्टेजवर घडलेला प्रसंग असो किंवा मग पुरस्कार स्वीकारल्यानंतरची त्यांची प्रतिक्रिया. पुरस्कार सोहळ्यातील प्रत्येक घडामोडींकडे सा-यांचं लक्ष असतं.बॉलिवूडच्या प्रसिद्ध पुरस्कार सोहळ्यांपैकी एक पुरस्कार सोहळा म्हणजे आयफा पुरस्कार सोहळा.या पुरस्कार सोहळ्याकडे बॉलिवूडसह सा-या जगाचं लक्ष असतं. यंदा न्यूयॉर्कमध्ये होणा-या पुरस्कार सोहळ्यात अशीच एक घटना घडली की ज्यामुळे हा सोहळा चांगलाच चर्चेत आला आहे.या सोहळ्यात पुरस्कार वितरण सोहळ्याला सुरुवात झाली.एकामागून एक पुरस्काराची घोषणा होत होती आणि विजेते पुरस्कार स्वीकारत होते.मात्र त्याचवेळी सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार प्रीतमला जाहीर झाला.'ऐ दिल है मुश्किल' या सिनेमासाठी प्रीतमच्या नावाची घोषणा करण्यात आली.यावेळी पुरस्कार सोहळ्याला प्रीतम उपस्थित नव्हता.त्यामुळे त्याच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा स्टेजच्या दिशेने पुढे सरसावला.मात्र त्याचवेळी अशी घटना घडली की सारेच अवाक झाले.यावेळी मनीष मल्होत्राचा पाय घसरला आणि तो स्टेजवर पडला.यावेळी काही वेळ कुणालाच काही कळले नाही की नेमकं काय घडलं.उपस्थितही यामुळे अवाक झाले.त्यामुळे सोहळ्यातील या घटनेची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.