IIFA 2017: ए.आर.रेहमान यांच्या कॉन्सर्ट दरम्यान शबाना आझमी यांनी केली या उपक्रमाची

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2017 13:25 IST2017-07-15T07:55:17+5:302017-07-15T13:25:17+5:30

न्यूयॉमध्ये 18व्या आयफा  पुरस्कार सोहळ्यात ऑस्कर पुरस्कार विजेता गायक ए.आर.रेहमान यांच्या खास परफॉर्मन्सने ही रात्र अधिक रंगतदार बनली होती. ...

IIFA 2017: During the AR Rahman concerts, Shabana Azmi has made this initiative | IIFA 2017: ए.आर.रेहमान यांच्या कॉन्सर्ट दरम्यान शबाना आझमी यांनी केली या उपक्रमाची

IIFA 2017: ए.आर.रेहमान यांच्या कॉन्सर्ट दरम्यान शबाना आझमी यांनी केली या उपक्रमाची

यूयॉमध्ये 18व्या आयफा  पुरस्कार सोहळ्यात ऑस्कर पुरस्कार विजेता गायक ए.आर.रेहमान यांच्या खास परफॉर्मन्सने ही रात्र अधिक रंगतदार बनली होती. ए.आर.रेहमान यांच्या संगीत कारकिर्दीला प्रकाशझोत टाकणारा या कार्यक्रमाने सोहळ्यात बहारदार रंगत आणली.रेहमानसोबत मोठ्या संख्येने त्याचे सहकारी या सोहळ्यासाठी दाखल झाले होते. 30 जणांच्या या क्रू मेंबरमध्ये संगीतकार, डान्सर्स आणि तंत्रज्ञ यांचा समावेश होता.मुंबई आणि लॉस एंजिलिसमधून हे सगळे जण या खास परफॉर्मन्ससाठी आले होते.  या सोहळ्यात परफॉर्मन्स करण्यासाठी दोन दिवसांपासून रेहमान आणि त्यांच्या सहका-यांचा जोरदार सराव केला होता.नुकतंच लंडनमधील रेहमानच्या कॉन्सर्टमधून संगीतप्रेमींनी काढता पाय घेतला होता.रेहमाननं मोजकीच हिंदी गाणी सादर केल्यामुळे लंडनमधील संगीत रसिक नाराज झाले होते. मात्र न्यूयॉर्कमध्ये रेहमानच्या कॉन्सर्टला रसिकांचा तुफान रिस्पॉन्स मिळाल्याचे पाहायला मिळाले. 'दिल से रे' या गाण्यापासून ते 'नादान परिंदे', दिल है छोटा सा, अशी एक से बढकर एक गाणी या कॉन्सर्टमध्ये सादर करण्यात आली.या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने एका सामाजिक उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.प्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी रेहमानच्या वतीने 'वन हार्ट' या उपक्रमाची घोषणा केली.या माध्यमातून संगीतकारांना त्यांच्या गरजेच्या वेळी मदत करण्यात येणार आहे.

Web Title: IIFA 2017: During the AR Rahman concerts, Shabana Azmi has made this initiative