IIFA 2017 : ...या सेलिब्रिटींनी पहिल्यांदाच आयफामध्ये लावली हजेरी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2017 15:49 IST2017-07-15T10:16:30+5:302017-07-15T15:49:19+5:30

१८ व्या आयफा २०१७ ची न्यूयॉर्कमध्ये धूम असून, बॉलिवूडच्या या रंगात संपूर्ण न्यूयॉर्क शहर उजळून निघाले आहे. ग्लॅमर, मस्ती ...

IIFA 2017: ... celebrities celebrated for the first time in IIFA! | IIFA 2017 : ...या सेलिब्रिटींनी पहिल्यांदाच आयफामध्ये लावली हजेरी!

IIFA 2017 : ...या सेलिब्रिटींनी पहिल्यांदाच आयफामध्ये लावली हजेरी!

व्या आयफा २०१७ ची न्यूयॉर्कमध्ये धूम असून, बॉलिवूडच्या या रंगात संपूर्ण न्यूयॉर्क शहर उजळून निघाले आहे. ग्लॅमर, मस्ती आणि स्टाइलचा तडका असलेल्या या महासोहळ्यात काही सेलेब्स असेही आहेत, जे पहिल्यांदाच या सोहळ्यांची रंगत अनुभवत आहेत. काहींनी तर आपल्या दमदार परफॉर्मन्सनी उपस्थितांची मने जिंकली आहेत. अशाच सेलिब्रिटींचा आढावा घेणारा हा वृत्तांत...!



वरुण धवन
वरुणचे नाव वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. कारण गेल्या पाच वर्षांपासून बॉलिवूडमध्ये अ‍ॅक्टिव्ह असलेल्या वरुणने एकदाही आयफा सोहळ्यात हजेरी लावली नाही. तो नेहमीच कुठल्या ना कुठल्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये किंवा आपल्या कमिटमेंट्समुळे आयफापासून दूर राहिला आहे. मात्र १८ व्या आयफा सोहळ्यात त्याने उपस्थिती लावली आहे. केवळ उपस्थिती नव्हे तर या सोहळ्यात त्याने जबरदस्त परफॉर्मन्सही केला आहे. त्याचबरोबर त्याने हा सोहळा होस्टदेखील केला आहे. 



सारा अली खान/ इब्राहिम अली खान
सैफ अली खान याची मोठी मुलगी सारा अली खान तिच्या बॉलिवूड डेब्यूची तयारी करीत आहे. मात्र याअगोदरच तिने आयफा डेब्यू केला आहे. साराने केवळ या सोहळ्यात उपस्थिती लावली नसून, लोकांमध्ये मिसळून या सोहळ्याची रंगत अनुभवली. साराचा हा पहिलाच आयफा असून, त्यामध्ये तिचे उपस्थिती विशेष ठरत आहे. त्याचबरोबर साराचा भाऊ इब्राहिम अली खान हादेखील पहिल्यांदाच आयफामध्ये सहभागी झाला आहे. 



दिशा पटानी
‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखविणारी अन् अभिनेता टायगर श्रॉफची कथित गर्लफ्रेंड दिशा पटानी हीदेखील पहिल्यांदाच आयफामध्ये उपस्थित राहिली आहे. बॉलिवूडमधील सर्वाधिक सुंदर अभिनेत्रींमध्ये दिशाची गणना केली जाते. तिचा फॅशन सेन्स कमालीचा असून, त्याची झलक ती सोशल मीडियावर दाखवित असते. असाच काहीसा दिशाचा जलवा आयफामध्ये बघावयास मिळाला. 



मीरा राजपूत/मीशा
अभिनेता शाहिद कपूर याने आतापर्यंत बºयाचदा आयफा सोहळ्यात हजेरी लावली आहे. काही आयफामध्ये तर त्याने होस्ट म्हणून भूमिका पार पाडली आहे. शिवाय जबरदस्त परफॉर्मन्स करून उपस्थितांची मने जिंकली आहेत. परंतु त्याची पत्नी मीरा राजपूत आणि मुलगी मीशा पहिल्यांदाच आयफात पोहोचले असून, याठिकाणी ते धमाल करताना बघावयास मिळत आहेत. मीरा बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याची चर्चा आहे. 

Web Title: IIFA 2017: ... celebrities celebrated for the first time in IIFA!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.