‘एक कहानी जूली की’ चे मोशन पोस्टर पाहाल तर वेडे व्हाल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2016 21:13 IST2016-06-05T15:34:40+5:302016-06-05T21:13:00+5:30
ड्रामा क्विन राखी सावंत हिचा ‘एक कहानी जूली की’ हा चित्रपट आगामी काळात आपल्याला बघायला मिळणार आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर आज रविवारी रिलीज करण्यात आले. मात्र हे पोस्टर रिलीज होताच, सोशल मीडिया युजर्स त्याची जोरदार खिल्ली उडवताना दिसले.

‘एक कहानी जूली की’ चे मोशन पोस्टर पाहाल तर वेडे व्हाल...
ड रामा क्विन राखी सावंत हिचा ‘एक कहानी जूली की’ हा चित्रपट आगामी काळात आपल्याला बघायला मिळणार आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर आज रविवारी रिलीज करण्यात आले. मात्र हे पोस्टर रिलीज होताच, सोशल मीडिया युजर्स त्याची जोरदार खिल्ली उडवताना दिसले. चित्रपटाची टॅग लाईनही अगदीच विचित्र आहे. ‘प्यार मे धोखा इसलिए ठोका’अशी याची टॅग लाईन आहे. ही टॅग लाईन आणि मोशन पोस्टर पाहून युजर्सने भलत्या भलत्या प्रतिक्रिया दिल्या. ‘इस मोशन पोस्टरने संडे बर्बाद कर दिया’ अशी प्रतिक्रिया काही युजर्सनी दिली. अजीज जी या चित्रपटाचे दिग्दर्शक आहे. मीडियातील वृत्तानुसार, हा चित्रपट बहुचर्चित शीना बोरा मर्डर केसवर आधारित आहे. राखी या चित्रपटात इंद्राणी मुखर्जीच्या भूमिकेत दिसणार आहे. आता मोशन पोस्टरलाच हा रिस्पॉन्स म्हटल्यावर चित्रपटाबद्दल विचारायलाच नको...तरीही आॅल दी बेस्ट राखी..!!
काही प्रतिक्रिया
काही प्रतिक्रिया

Sunday officially ruined!
Next movie of Rakhi Sawant... Salvar mein Talwar