या अभिनेत्रींच्या भीतीचे कारण ऐकल्यास तुम्ही पोट धरून हसाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 22:18 IST2016-12-21T21:47:45+5:302016-12-21T22:18:19+5:30

सध्या अ‍ॅक्शनपटाचा जमाना असून, त्यात अभिनेत्याबरोबरच अभिनेत्रीदेखील जबरदस्त अ‍ॅक्शन करताना बघावयास मिळतात. नाजुक, सुंदर ही ओळख बाजूला सारून अतिशय ...

If you hear the reason for fear of these actresses, you will laugh! | या अभिनेत्रींच्या भीतीचे कारण ऐकल्यास तुम्ही पोट धरून हसाल!

या अभिनेत्रींच्या भीतीचे कारण ऐकल्यास तुम्ही पोट धरून हसाल!

्या अ‍ॅक्शनपटाचा जमाना असून, त्यात अभिनेत्याबरोबरच अभिनेत्रीदेखील जबरदस्त अ‍ॅक्शन करताना बघावयास मिळतात. नाजुक, सुंदर ही ओळख बाजूला सारून अतिशय धासू अंदाजात या अभिनेत्री जेव्हा अ‍ॅक्शनचे जलवे दाखवितात, तेव्हा प्रेक्षकही दंग झाल्याशिवाय राहत नाहीत. मात्र या धासू अंदाजात दिसणाºया अभिनेत्री वास्तविक जीवनात पाल, मांजर किंवा फुलपाखराला घाबरतात, असे सांगितले तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे, बॉलिवूडमधील बºयाचशा अशा अभिनेत्री आहेत ज्यांची भीती अंगावर थरकाप आणणारी नाही तर, ओठावर हसू आणणारी आहे. या कोणत्या अभिनेत्री आहेत, त्यांच्यावरील हा वृत्तांत...



दीपिका पादुकोन 
‘ट्रिपल एक्स’ या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोन ही जबरदस्त अ‍ॅक्शनसाठी ओळखली जाते. ट्रिपल एक्स या चित्रपटाच्या ट्रेलरवरून तुमच्या लक्षात येईलच. कारण या चित्रपटात तिने जबरदस्त स्टंट केले आहेत. मात्र दीपिकाला सापांची खूप भीती वाटते. सेटवर तिला सापासोबत एखादा सीन शूट करायचे सांगितल्यास ती त्याला सपशेल नकार देते. साप दिसला की दीपिकाची बोलतीच बंद होते. 



बिपाशा बसू

ब्लॅक ब्युटी या ओळखीबरोबरच बॉक्सिंगसाठी ओळखल्या जाणाºया बिपाशाने हॉरर चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. हॉरर पटातील तिचा अभिनय अनेकांची बोलती बंद करणारा आहे. बºयाचशा चित्रपटात तर बिपाशानेच भुताची भूमिका साकारून भल्याभल्यांना घाम फोडला आहे. परंतु ही धाडसी अभिनेत्री कशाला घाबरते हे तुम्ही ऐकले तर तुमचा विश्वासच बसणार नाही. वास्तविक जीवनात रफ अ‍ॅण्ड टफ अशी ओळख असलेली बिपाशा चक्क पालीला घाबरते. तिला भितींवर पाल जरी दिसली तरी ती तेथून पळ काढते.



प्रियंका चोपडा
बºयाचशा चित्रपटात प्रियंकाला आपण घोडेस्वारी करताना बघितले आहे. परंतु वास्तविक जीवनात ती घोड्यांना प्रचंड घाबरते. घोडा चावतो किंवा लाथ मारतो हा तिचा पक्का समज झाल्याने ती या प्राण्यापासून दूरच राहणे पसंत करते. चित्रपटासाठी जरी तिला घोड्यावर बसून एखादा सीन शूट करायचा झाल्यास ती प्रचंड घबरदारी घेऊनच या सीन्सला सामोरे जाते. अर्थात यासाठी ती दिग्दर्शकांसमोर काही अटी व शर्ती ठेवत असल्याचे तिनेच एकदा कबूल केले आहे.  



सेलेना जेटली
अभिनेत्री सेलेना जेटली जरी सध्या बॉलिवूडपासून दूर असली तरी पार्टी किंवा इव्हेंटच्या निमित्ताने ती नेहमीच चर्चेत असते. आपल्या मोजक्याच चित्रपटांमध्ये तिने साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांना भावल्याने आजही हा चेहरा प्रेक्षकांना प्रतीक्षेत आहे. अशा या लाडक्या अभिनेत्रीच्या भीतीचे कारण जर तुम्ही विचारले तर तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही. कारण सेलेनाला चक्क फुलपाखराची भीती वाटते. अतिशय सुंदर आणि कोणालाही नुकसान न पोहचविणाºया फुलपाखराचे खरं तर सगळ्यांनाच आकर्षण असते.



विद्या बालन
‘द डर्टी पिक्चर’मधील विद्या बालन जर तुम्हाला आठवत असेल तर तिच्या धासू स्वभावाचा अंदाज बांधणे सहज शक्य होईल. कारण ज्या पद्धतीने तिने चित्रपटात भूमिका साकारली आहे, त्यावरून विद्यामधील धाडसी स्वभाव सहज अधोरेखित होतो. मात्र वास्तविक जीवनात विद्या खूपच भित्रट असल्याचे समजते. विद्याला सर्वाधिक भीती मांजरीची वाटते. मांजर दिसली की विद्याची बोलतीच बंद होते. 



कॅटरीना कैफ

कॅटरीनाच्या भीतीचे कारण जर तुम्ही ऐकल्यास तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. होय, कॅटरीनाला कोण्या प्राणी, पक्षी किंवा किटकाची भीती वाटत नाही, तर तिला चक्क टोमॅटोची भीती वाटते. आता तिच्या या भीतीमागचे नेमके कारण काय हे सांगणे जरा मुश्किलच आहे. मात्र टोमॅटो हा जरी खाण्याचा पदार्थ असला तरी, पब्लिकमध्ये टोमॅटो फेकून मारण्याचीही पद्धत असल्याने कदाचित कॅटरीना टोमॅटोला घाबरत असावी. 



सोनम कपूर
बॉलिवूडमध्ये सोनम कपूर आपल्या स्टायलिश अंदाजासाठी ओळखली जाते. आतापर्यंत जरी तिने अ‍ॅक्शनपटांमध्ये भूमिका साकारली नसली तरी तिचा ‘नीरजा’ हा बॉयोपिक तिच्यातील धाडसी स्वभाव दर्शविणारा आहे. मात्र असे असले तरी सोनमला लिफ्टची प्रचंड भीती वाटते. ती लिफ्टमध्ये जाण्यापूर्वीच सुरक्षेबाबतची चौकशी करून घेते. खातरजमा झाल्यानंतरच ती लिफ्टमध्ये जाण्याचे धाडस करते. 



करिना कपूर-अनुष्का शर्मा
‘सुल्तान, रब ने बना दी जोडी’ या चित्रपटात बाइक रायडिंग करणारी अभिनेत्री अनुष्का शर्मा वास्तविक जीवनात बाइक रायडिंगला प्रचंड घाबरते. अशीच भीती करिना कपूर हिलादेखील वाटते. त्यामुळे या दोघीही बाइक रायडिंगच्या सीनला फाटा देण्याचा प्रयत्न करीत असतात. शक्यतो या सीनचा सामना करायचा नाही, हा त्यांचा पक्का विचार असतो. 



आलिया भट्ट
बॉलिवूडमध्ये कमी काळात मोठी झेप घेतलेली अभिनेत्री आलिया भट्ट अंधाराला प्रचंड घाबरते. अंधारात जाण्याचे ती कधीच धाडस करीत नाही. अंधार दिसला की ती तेथून पळ काढते. वास्तविक जीवनाबरोबरच ती चित्रपटांमध्येदेखील अंधारातील सीन्स करण्यास नकार देते.  

Web Title: If you hear the reason for fear of these actresses, you will laugh!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.