​हा चित्रपट तुम्हाला आवडला नाही तर तुम्हाला मिळणार पैसे परत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 14:42 IST2017-09-28T09:12:30+5:302017-09-28T14:42:30+5:30

चित्रपटगृहात कोणताही चित्रपट पाहायचा म्हटले की, त्या चित्रपटाच्या तिकिटाच्या मागे आपले दोनशे-अडीजशे रुपये तरी जातात आणि त्यातही आपल्याला चित्रपट ...

If you do not like this movie you will get money back | ​हा चित्रपट तुम्हाला आवडला नाही तर तुम्हाला मिळणार पैसे परत

​हा चित्रपट तुम्हाला आवडला नाही तर तुम्हाला मिळणार पैसे परत

त्रपटगृहात कोणताही चित्रपट पाहायचा म्हटले की, त्या चित्रपटाच्या तिकिटाच्या मागे आपले दोनशे-अडीजशे रुपये तरी जातात आणि त्यातही आपल्याला चित्रपट आवडला नाही तर आपले पैसे वाया गेले असेच आपल्याला वाटते. अनेक वेळा तर या चित्रपटाच्या निर्मात्यांकडून चित्रपटाचे पैसेच परत घेतले पाहिजे असे आपल्याला वाटत असते. पण ही गोष्ट प्रत्यक्षात करणे अशक्य असते. प्रेक्षकांना चित्रपट आवडला नाही, म्हणून कोणताही निर्माता प्रेक्षकांना पैसे परत करायला तयार होत नाही. पण आता एक निर्माता प्रेक्षकांना चित्रपट आवडला नाही तर त्यांचे तिकिटाचे सगळे पैसे परत करणार आहे. 
सीआरडी हा चित्रपट २९ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात मृण्मयी गोडबोले, विनय शर्मा, गितीका त्यागी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाद्वारे जय मल्हार या मालिकेमुळे नावारूपाला आलेली इशा केसकर देखील मोठ्या पडद्याकडे वळत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन क्रांती कानडे करत असून त्यांना त्यांच्या शॉर्ट फिल्मसाठी राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. 
सीआरडी या चित्रपटाचे निर्माते क्रांती कारंडे यांनी या चित्रपटाच्या निमित्ताने एक वेगळीच घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, माझा चित्रपट प्रेक्षकांना न आवडल्यास त्यांना त्यांच्या तिकिटाचे पैसे परत केले जातील. सीआरडी या चित्रपटाचे जगभरातील अनेक फेस्टिव्हलमध्ये कौतुक करण्यात आलेले आहे. याविषयी या चित्रपटाचे निर्माते क्रांती कानडे सांगतात, अनेकवेळा चित्रपट प्रेक्षकांना न आवडल्यास ते तो चित्रपट पाहायला पुन्हा चित्रपटगृहात जात नाहीत. तसेच इतरांना देखील चित्रपटाविषयी चांगले सांगत नाही. यामुळे दुसऱ्या आठवड्यानंतर खूपच कमी प्रेक्षक चित्रपटगृहाकडे वळतात. प्रेक्षकांच्या मनात आपल्या चित्रपटाविषयी आत्मविश्वास निर्माण करणे हे गरजेचे आहे असे मला वाटते. त्यामुळे चित्रपट प्रेक्षकांना न आवडल्यास त्यांना त्यांचा पैसा हा परत केलाच पाहिजे असे माझे मत आहे. 
आजवर अनेक चित्रपटांना प्रेक्षकांनी शिव्या घातल्या आहेत. प्रसिद्ध अभिनेते, अभिनेत्यांचे चित्रपट पाहिल्यानंतरही चित्रपट किती फालतू होता, निर्मात्यांनी आपल्याला पैसे परत केले पाहिजे असे आपण अनेकवेळा बोलतो. तुम्ही चित्रपटगृहात पाहिलेल्या कोणत्या चित्रपटाचे तुमचे पैसे वाया गेले आणि निर्मात्यांनी ते पैसे परत केले पाहिजे असे तुम्हाला वाटते हे तुम्ही तुमच्या प्रतिक्रियांद्वारे कळवा. 

Web Title: If you do not like this movie you will get money back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.