​‘ही’ चर्चा खरी असेल तर शाहरूख खान देणार आणखी एक फ्लॉप!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 14:59 IST2017-09-06T09:26:42+5:302017-09-06T14:59:39+5:30

शाहरूख खान सध्या आनंद एल राय यांच्या चित्रपटात बिझी आहे. किंगखानने या चित्रपटाचे शूटींगही सुरू केले आहे. अर्थात अद्याप ...

If this talk is true then Shahrukh Khan will have another flop !! | ​‘ही’ चर्चा खरी असेल तर शाहरूख खान देणार आणखी एक फ्लॉप!!

​‘ही’ चर्चा खरी असेल तर शाहरूख खान देणार आणखी एक फ्लॉप!!

हरूख खान सध्या आनंद एल राय यांच्या चित्रपटात बिझी आहे. किंगखानने या चित्रपटाचे शूटींगही सुरू केले आहे. अर्थात अद्याप ना चित्रपटाच्या हिरोईन्सने शूटींग सुुरू केलेय, ना याबाबत काही अधिकृत घोषण झालीय. तरिही हा चित्रपट चर्चेत आहे. कारण  सध्या बी-टाऊनमध्ये एक चर्चा वणव्यासारखी पसरतेय. विशेष म्हणजे, ही चर्चा खरी असेल तर शाहरूख पुन्हा एकदा एक फ्लॉप देणार, असेही म्हटले जात आहे. आता ही चर्चा कुठली तर शाहरूख या चित्रपटात साकारणार असलेल्या बुटक्या व्यक्तीच्या पात्राविषयीची. होय, शाहरूख या चित्रपटात बुटक्या व्यक्तीच्या रूपात दिसणार असल्याचे मानले जात आहे. शाहरूखची ही व्यक्तीरेखा ‘गेम आॅफ थ्रोन्स’या इंग्रजी सीरिजमधील टीरिनयल लेनिस्टर या पात्रावर आधारित असल्याचे सांगितले जाते. म्हणजेच, ही बुटकी व्यक्ती दुसºया लोकांमध्ये प्रेम वाढवून त्यांच्यातील दुवा ठरेल.



ALSO READ : OMG!! ​शाहरूख खानचे ‘स्टारडम’ धोक्यात तर नाही?

आता ‘गेम आॅफ थ्रोन्स’ प्रेक्षकांच्या आवडीची शृंखला आहे. अशाच यातील आवडत्या पात्राची कॉपी किंवा छेडछाड लोकांना कदापि आवडणार नाही आणि असे झालेच तर शाहरूखचा हा आगामी चित्रपटही फ्लॉपच्या यादीत जावून बसणे निश्चित आहे.
अलीकडे आनंद एल राय यांनी या चित्रपटाबदद्लचे काही डिटेल्स शेअर केले होते. या चित्रपटाकडे केवळ बुटक्याची स्टोरी म्हणून बघू नका. ही एका लहान माणसाची मोठी कथा आहे. यात शाहरूख बुटक्या व्यक्तीच्या भूमिकेत दिसेल.  त्याच्या या पात्राची कमल हासनच्या ‘अप्पू राजा’शी तुलना केली जात आहे. अर्थात चित्रपटाशी संबंधित अनेकांनी याचा इन्कार केला आहे. या चित्रपटात कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत आहे. यात ती ‘मेरी जान’ नामक पात्र साकारणार आहे. आधी हा चित्रपट सलमान खान करणार होता. त्याला ही कथा प्रचंड आवडली होती. पण अचानक सलमानने या चित्रपटाला नकार कळवला आणि हा चित्रपट शाहरूखकडे आला. आता चर्चा खरी न ठरो अन् शाहरूखला एक तरी हिट मिळो, हीच शुभेच्छा देऊ यात!

Web Title: If this talk is true then Shahrukh Khan will have another flop !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.