ठरलं तर! या दिवशी रिलीज होणार राजकुमार रावचा 'स्त्री २'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 15:16 IST2023-04-14T15:15:33+5:302023-04-14T15:16:29+5:30
Rajkumar Rao : बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावचा 'स्त्री' चित्रपट २०१८ साली रिलीज झाला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता.

ठरलं तर! या दिवशी रिलीज होणार राजकुमार रावचा 'स्त्री २'
बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव(Rajkumar Rao)चा 'स्त्री' चित्रपट २०१८ साली रिलीज झाला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. समीक्षकांनी प्रशंसित केलेला चित्रपट आणि वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट होता. राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर या नव्या जोडीने चाहत्यांना वेड लावलं. आता ही जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
स्त्री चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची अत्यंत आतुरतेने वाट पाहिली जात होती. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात, पॉवरहाऊस परफॉर्मरने त्याच्या टीमसह रिलीजची तारीख जाहीर केली. मोठ्या दिमाखात या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली. स्त्री २ चित्रपट ३१ ऑगस्ट, २०२४ ला रिलीज होणार आहे. त्याच दिवशी स्त्री चा पहिला भाग रिलीज झाला होता.
अगदी अलीकडे, राजकुमार रावला दोन प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यात 'मोस्ट स्टायलिश युथ आयकॉन' आणि 'सर्वोत्कृष्ट अभिनेता- ज्युरी' प्रदान करण्यात आले. स्त्री 2, मिस्टर अँड मिसेस माही, गन्स आणि गुलाब आणि श्रीकांत बोल्लाचा बायोपिक हे राजकुमार रावचे आगामी प्रोजेक्ट आहेत. हे वर्ष निश्चितच राजकुमार रावसाठी खास ठरणार आहे.