"माझी गरज लागली तर मी बॉर्डरवर जाऊन युद्ध लढण्यासाठी तयार", प्रसिद्ध अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 11:06 IST2025-05-09T11:01:00+5:302025-05-09T11:06:46+5:30
सुप्रसिद्ध अभिनेत्याने सध्याच्या भारत-पाक युद्धजन्य परिस्थितीत लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे. या अभिनेत्याने बॉर्डरवर युद्ध लढण्याची तयारी दाखवली आहे

"माझी गरज लागली तर मी बॉर्डरवर जाऊन युद्ध लढण्यासाठी तयार", प्रसिद्ध अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
गेल्या दोन दिवसांपासून भारत-पाकिस्तान देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सुरुवातीला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पहलगाम हल्लाविरोधात पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं. याशिवाय काही तासांपूर्वीच भारतीय सैन्याने पाकिस्तानवर एकामागून एक हल्ले करुन त्यांना अडचणीत आणलंय. अशातच एका सुप्रसिद्ध अभिनेत्याने सोशल मीडियावर "माझी गरज लागली तर मी युद्धासाठी तयार", अशी पोस्ट केली आहे. जी चर्चेत आहे.
मी बॉर्डरवर युद्धासाठी तयार
प्रसिद्ध अभिनेता आणि फिल्म समीक्षक कमाल आर खानने काल ट्विटरवर दोन ओळींची पोस्ट केली. ज्यात तो लिहितो की, "माझी गरज लागली तर मी युद्धासाठी बॉर्डरवर जाण्यास तयार आहे. जय हिंद. वंदे मातरम!", अशा शब्दात कमाल खानने बॉर्डरवर जाऊन युद्ध लढण्याची तयारी दाखवली आहे. कमालने केलेल्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा होत आहे. कमालच्या वक्तव्याला काहींनी समर्थन दिलं आहे.
भारत-पाकिस्तान युद्ध तणाव
भारताने ऑपरेशन सिंदूर हे मिशन राबवलं आणि यात पाकिस्तानी दहशतवाद्यांची नऊ तळी उद्धवस्त झाली. त्यानंतर पाकिस्तान चांगलाच बिथरला असून त्याने भारतावर ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण पाकिस्तानचा हल्ला भारताने परतवून लावला. अशातच काल भारतीय नौदलानेही पाकिस्तानविरोधात मोर्चा उघडला आहे. भारतीय युद्धनौका INS विक्रांतने कराची बंदरावर जोरदार हल्ला केला आहे. या हल्ल्याची कराची बंदरात मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे. हे युद्ध येत्या काही दिवसांमध्ये कोणतं वळण घेईल, याची सर्वांना उत्सुकता आहे.