८ जण एकत्र पोझ देऊन उभे असलेल्या या फोटोत सलमान खानला ओळखा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2017 11:24 IST2017-10-25T05:54:02+5:302017-10-25T11:24:02+5:30

सध्या अभिनेता सलमान खान त्याच्या कमिटमेन्ट पूर्ण करण्यात बिझी आहे. छोट्या पडद्यावर बिग बॉस सीझन ११मधून तो रसिकांच्या भेटीला ...

Identify Salman Khan in this photo that picks up 8 people together. | ८ जण एकत्र पोझ देऊन उभे असलेल्या या फोटोत सलमान खानला ओळखा?

८ जण एकत्र पोझ देऊन उभे असलेल्या या फोटोत सलमान खानला ओळखा?

्या अभिनेता सलमान खान त्याच्या कमिटमेन्ट पूर्ण करण्यात बिझी आहे. छोट्या पडद्यावर बिग बॉस सीझन ११मधून तो रसिकांच्या भेटीला येतो आहे. लवकरच त्याचा 'टायगर जिंदा है' हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. त्याचा अभिनय, त्याचा डान्स, कॉमेडी आणि त्याच्या ना ना हरकती यावर रसिक फिदा आहेत. त्यामुळेच सलमानचे कित्येक फॅन्स त्याच्यावर अक्षरक्षः जीव ओवाळून टाकतात. त्यामुळे आपल्या या लाडक्या स्टारविषयी जाणून घेण्याची प्रत्येकालाच इच्छा असते. त्याच्याविषयीच्या विविध बारीकसारीक गोष्टींमध्ये रसिकांना रस असतो. त्यातच या लाडक्या स्टारचे जुने फोटो पाहायला मिळाले तर क्या बात. सध्या सलमानचे असेच काही जुने फोटो व्हायरल होत आहेत. यात एक जुना ग्रुप फोटो समोर आला आहे. यांत  ८ जण एकत्र पोझ देऊन उभे आहेत. या सगळ्यांमध्ये सलमान खानसुद्धा आहे.सलमानचे खरेखुरे किंवा डायहार्ट फॅन तुम्ही असाल तर या फोटोत सलमानला ओळखणं तुमच्यासाठी फार कठीण काम नाही. हा फोटो जवळपास ३५ ते ४० वर्षे जुना असल्याचे फोटोच्या प्रिंटवरुन तुम्हाला लक्षात येईल.सलमानचा जुना फोटो समोर येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी काही दिवसांपूर्वी खुद्द सलमान खानने सोशल मीडियावर त्याचा बालपणीचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोत सलमानसह त्याचे भाऊबहिण पाहायला मिळाले. खान बंधू भगिनीचा हा बालपणीचा फोटो रसिकांना चांगलाच भावला. अल्पावधीतच या फोटोवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव सुरु झाला. आता आणखी एका अशाच सलमानच्या जुन्या फोटोची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. आम्ही तर या फोटोत सलमानला ओळखले आहे, आता तुम्हीसुद्धा ओळखा पाहू यातील सलमान खान कुठे आहे?

सलमान खान सध्या छोट्या पडद्यावर 'बिग बॉस-11' या रिअॅलिटी शोचा होस्ट बनून रसिकांच्या भेटीला येत आहे. याशिवाय रुपेरी पडद्यावरही लवकरच पुन्हा एकदा भाईजानचा जलवा पाहायला मिळणार आहे. सलमानचा 'टायगर जिंदा है' हा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ब-याच काळानंतर सलमान अभिनेत्री कॅटरिनासह झळकणार आहे. अली अब्बास जफर या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे. सलमानच्या या आगामी सिनेमाची रसिकांना आता उत्सुकता लागली आहे.मात्र सध्या सोशल मीडियावरील  जुन्या फोटोंमुळे नॉस्टेलॅजिक झालेला सलमान खान सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. 

Web Title: Identify Salman Khan in this photo that picks up 8 people together.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.