'कुछ कुछ होता है' या आयकॉनिक सिनेमाला २५ वर्षे पूर्ण; स्पेशल स्क्रीनिंगला पोहचला शाहरुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 12:28 IST2023-10-16T12:22:41+5:302023-10-16T12:28:01+5:30

‘कुछ कुछ होता है’ चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जीने हजेरी लावली.

Iconic movie 'Kuch Kuch Hota Hai' completes 25 years; Shah Rukh reached the special screening | 'कुछ कुछ होता है' या आयकॉनिक सिनेमाला २५ वर्षे पूर्ण; स्पेशल स्क्रीनिंगला पोहचला शाहरुख

'कुछ कुछ होता है' या आयकॉनिक सिनेमाला २५ वर्षे पूर्ण; स्पेशल स्क्रीनिंगला पोहचला शाहरुख

 'कुछ कुछ होता है' या चित्रपटाला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. या खास प्रसंगी निर्माते करण जोहरने 15 ऑक्टोबर रोजी मुंबईत चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग आयोजित केले होते. यावेळी करण जोहर, शाहरुख खान आणि राणी मुखर्जी देखील उपस्थित होते. मात्र, या काळात काजोल आणि सलमान खान गैरहजर राहिले. 


आज 'कुछ कुछ होता है' या चित्रपटाच्या स्क्रिनिंगमध्ये शाहरुख खानने चित्रपटाशी संबंधित सर्व कलाकार आणि निर्मात्यांचे आभार मानले, परंतु सलमान खानचे नाव घेण्यास तो चुकला. अशा स्थितीत एका चाहत्याने त्याला टोकलं. तू सलमानचे आभार का मानले नाहीस? हे ऐकून शाहरुखने मजेशीर उत्तर दिलं. तुम्ही सलमानचे नाव का घेतले नाही, असे चाहत्याने विचारताच शाहरुखने लगेचच तो इंटरव्हलनंतर येईल, असे म्हटलं

धर्मा प्रोडक्शनमध्ये बनवलेला कुछ कुछ होता है हा चित्रपट करण जोहरने दिग्दर्शित केला होता. 16 ऑक्टोबर 1998 रोजी प्रदर्शित झालेला हा त्यांचा दिग्दर्शनातील पहिला चित्रपट होता. या चित्रपटात शाहरुख खान, काजोल, राणी मुखर्जी यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. हा चित्रपट होता आणि सुपरहिट ठरला. लोकांमध्ये या सिनेमाची क्रेझ अजूनही कायम आहे.  

Web Title: Iconic movie 'Kuch Kuch Hota Hai' completes 25 years; Shah Rukh reached the special screening