VIDEO : भज्जीच्या गोलंदाजीवर कतरिना कैफची बॅटिंग; हिल्स घालून खेळली क्रिकेट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2022 03:04 PM2022-10-30T15:04:17+5:302022-10-30T15:12:15+5:30

ICC Mens T20 World Cup 2022, Katrina Kaif  : टीम इंडियाला चीअर करायला कतरिना स्टार स्पोर्ट्सच्या सेटवर पोहोचली. यावेळी कतरिना हरभजन सिंगच्या बॉलवर तुफान बॅटिंग करताना दिसली.

ICC T20 World Cup 2022 katrina kaif plays cricket before the match | VIDEO : भज्जीच्या गोलंदाजीवर कतरिना कैफची बॅटिंग; हिल्स घालून खेळली क्रिकेट

VIDEO : भज्जीच्या गोलंदाजीवर कतरिना कैफची बॅटिंग; हिल्स घालून खेळली क्रिकेट

googlenewsNext

 ICC Mens T20 World Cup 2022 : कतरिना कैफ (Katrina Kaif ) सध्या ‘फोन भूत’ या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. रिलीजच्या तोंडावर कतरिना दिवसरात्र प्रमोशन करतेय. सोबत सिद्धांत चतुर्वेदी व ईशान खट्टर हे तिचे को-स्टार्स आहेतच. कालपरवा कतरिना बिग बॉस 16 मध्ये सलमानसोबत या चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसली. आता आता ती स्टार स्पोर्ट्सच्या सेटवर पोहोचली. होय, टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने सातत्यपूर्ण कामगिरी करत पहिल्या दोन सामन्यात दणदणीत विजय मिळवला आहे. आज रविवारी होणाऱ्या लढतीत टीम इंडियाची गाठ दक्षिण आफ्रिकेशी पडणार आहे. हा सामना ऑस्ट्रेलियातील वेगवान खेळपट्टी ओळखल्या जाणाऱ्या पर्थ येथे खेळवला जाणार आहे. आपल्या टीम इंडियाला चीअर करायला कतरिना स्टार स्पोर्ट्सच्या सेटवर पोहोचली. 

यावेळी कतरिना हरभजन सिंगच्या बॉलवर तुफान बॅटिंग करताना दिसली. कतरिनाने बॅट हातात घेतली तर ईशान खट्टर व सिद्धांत चतुर्वेदी फिल्डिंग करताना दिसले. हिल्ससोबत क्रिकेट खेळणं थोडं कठीण आहे, पण मी मॅनेज करू शकते, असं कतरिना पहिल्या बॉलच्या आधी म्हणाली. यावेळी कतरिना जोरदार षट्कारही ठोकला. कतरिनाचा हा क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ फॅन पेजवर तुफान व्हायरल होतोय.

कतरिनाच्या ‘फोन भूत’ या चित्रपटाबद्दल सांगायचं तर हा एक हॉरर कॉमेडी सिनेमा आहे. यात कतरिनाशिवाय सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर लीड रोलमध्ये आहे. या चित्रपटात कतरिना पहिल्यांदा भूताची भूमिका साकारताना दिसणार आहे. येत्या 4 नोव्हेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होतोय.

Web Title: ICC T20 World Cup 2022 katrina kaif plays cricket before the match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.