...तर करणने केलाच नसता ‘ऐ दिल हैं मुश्किल’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2016 16:07 IST2016-11-15T16:07:42+5:302016-11-15T16:07:42+5:30
रणबीर-ऐश्वर्या रॉय बच्चन यांचे इंटीमेंट सीन्स, पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याची भूमिका अशा अनेक कारणांमुळे ‘ऐ दिल हैं मुश्किल’ ...
.jpg)
...तर करणने केलाच नसता ‘ऐ दिल हैं मुश्किल’!
र बीर-ऐश्वर्या रॉय बच्चन यांचे इंटीमेंट सीन्स, पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याची भूमिका अशा अनेक कारणांमुळे ‘ऐ दिल हैं मुश्किल’ वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. पण याऊपरही ऐ दिल हैं मुश्किल’ने अजय देवगणच्या ‘शिवाय’ला पछाडत १०० कोटींच्या घरात कमाई केली. हा सिनेमा करण जोहरच्या करिअरमधील एक बेंचमार्क म्हणून सिद्ध होतोय. पण या यशात ऐश्वर्या रायचा मोठा वाटा आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे का? होय, इतका मोठी की, ऐश्वर्याने नकार दिला असता तर कदाचित हा चित्रपटच तयार झाला नसता. या चित्रपटात ऐश्वर्याने ‘सबा’ ची भूमिका साकारली आहे. नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान बोलताना खुद्द करणनेच हा गौप्यस्फोट केला.
![]()
ऐश्वर्या रॉय बच्चनने ‘ऐ दिल..’ ला नकार दिला असता तर कदाचित मी हा चित्रपट बनवलाच नसता. ऐश ही भूमिका करेल की नाही? अशी मला भीती होती. लग्नानंतर अशा भूमिका करण्यापूर्वी अभिनेत्री विचार करतात. मात्र, ‘बोल्ड अॅण्ड ब्युटीफुल’ अशा कवयित्री सबाची भूमिका करायला ऐश लगेचच तयार झाली आणि माझा जीव भांड्यात पडला, असे करण म्हणाला.
![]()
या चित्रपटात ऐश्वर्याची लहान पण अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. आत्तापर्यंतच्या भूमिकांपैकी अतिशय बोल्ड आणि सर्वोत्कृष्ट भूमिका म्हणून याकडे पाहिले जात आहे. एकंदर काय तर, आराध्याच्या जन्माच्या तब्बल तीन वर्षांनंतर कमबॅक करूनही ऐशने सध्याच्या ‘ए’ ग्रेड अभिनेत्रींना मागे टाकले.