खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो..
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2016 17:00 IST2016-05-13T11:30:14+5:302016-05-13T17:00:14+5:30
बॉलीवुडच्या सेलिब्रिटींसाठी प्रेम, अफेअर या खूप कॉमन गोष्टी.. कुणाचं सूत कुणाशी जुळेल हे सांगणं कठीण.. याच लव्ह अफेअरच्या चक्करमध्ये ...

खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो..
बॉलीवुडची मुन्नी मलायका अरोरा खान आणि तिच्याहून तब्बल 12 वर्षांनी लहान असलेल्या अर्जुन कपूरमध्ये सध्या गुटर-गूं सुरु आहे.. दोघांच्या अफेअरच्या खुमासदार चर्चा बी-टाऊनमध्ये रंगल्यात. दोघंही एकमेकांना डेट करतायत.. मलायका आणि अरबाज खान या बी-टाऊनच्या कपल्समध्ये ब्रेकअपचं कारणही हेच अफेअर असल्याचं आता समोर येतंय..
काही वर्षांआधी अर्जुन कपूर सलमानची छोटी बहिण अर्पिताला डेट करत होता. मात्र त्यानंतर त्याचं मन मलायकावर लट्टू झालं. दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले.. हे प्रेम इतकं वाढलं की दोघं चोरी चोरी चुपके चुपके भेटू लागले. एकीकडे अरबाज आणि मलायकाचं नातं तुटत असताना अर्जुन आणि मलायका या दोघांची लव्ह स्टोरी रंगू लागली. प्रेम, रुसवे-फुगवे असे विविध रंग दोघांमध्ये पाहायला मिळू लागले.. एकदा तर अर्जुन आणि मलायकामध्ये कडाक्याचं भांडण झालं.. मात्र मलायकाची समजूत काढण्यासाठी अर्जुन तिला अज्ञातस्थळी घेऊन गेला अन् भांडणाचं रुपांतर पुन्हा प्रेमात झालं. विविध पार्ट्या आणि पुरस्कार सोहळ्यातही दोघांची जवळीक सा-यांच्या चर्चेचा विषय ठरली..
एवढं सगळं होत असताना अर्जुन मात्र अफेरच्या चर्चांचा इन्कारच करत होता.. मलायका आणि आपल्यात काही नसून सलमानला कळलं तर माझा जीव घेईल असंही तिनं अर्जुननं म्हटलं होतं.. तर सगळ्या गोष्टीवर स्पष्टीकरण देणं गरजेचं नाही असं सांगत मलायकानं या प्रेमाची अप्रत्यक्ष कबुली दिली..आता तर मलायका आणि अरबाज खान यांचा काडीमोड झालाय.. त्यामुळं मलायका आणि अर्जुन म्हणतायत खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो.