​वयाच्या नव्वदीतही मी अभिनय करत राहीन- आलिया भट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2017 18:12 IST2017-10-10T12:42:58+5:302017-10-10T18:12:58+5:30

अल्पावधीत सिनेसृष्टीत आपले सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर राज करणारी बॉलिवूडची उगवती 'स्टार' आलिया भट्टच्या चाहत्यांसाठी एक सुखद बातमी आहे, ...

I will continue acting in the nineties - Alia Bhat! | ​वयाच्या नव्वदीतही मी अभिनय करत राहीन- आलिया भट !

​वयाच्या नव्वदीतही मी अभिनय करत राहीन- आलिया भट !

्पावधीत सिनेसृष्टीत आपले सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर राज करणारी बॉलिवूडची उगवती 'स्टार' आलिया भट्टच्या चाहत्यांसाठी एक सुखद बातमी आहे, ती म्हणजे आलिया वयाच्या नव्वदी पर्यंतही अभिनय करणार आहे. 
 
'वयाच्या नव्वदीतही मी अभिनय करत राहीन,' असे तिने एका चित्रपट महोत्सवाप्रसंगी दिलेल्या मुलाखतीत व्यक्तव्य केले. आपली सलमान आणि शाहरूखसोबत कधीकाळी काम करणाऱ्या नट्या हल्ली चित्रपटात दिसत नाहीत, असं तिला एकाने विचारले असता तिनं ही इच्छा बोलून दाखवली. 'बॉलिवूडमध्ये अभिनेत्यांच्या तुलनेत अभिनेत्रींचं करियर कमी असतं हे खरं आहे. मात्र, आता ट्रेंड बदलतो आहे. अभिनेत्रीही प्रदीर्घ काळ मोठ्या पडद्यावर दिसू लागल्या आहेत,' असं ती म्हणाली. 

'अभिनेत्री जास्त काळ पडद्यावर न दिसण्याला चित्रपट लेखक जबाबदार आहेत', असंही ती पुढं म्हणाली. 'लेखकांवर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. लग्न झालेल्या अभिनेत्रींसाठी ते एखादी भूमिका लिहायला घेत असतील तर त्यांनी अनेक गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. पण आपल्याकडं अनेकदा अभिनेत्रींच्या वयाला अनुसरून भूमिकाच लिहिल्या जात नाहीत. त्यामुळंच अनेक अभिनेत्रींना त्यांच्याच वयाच्या सलमान, शाहरूख, आमीर आणि अक्षय कुमारसोबत काम करण्याची संधी मिळत नाही,' असं ती म्हणाली. 'मला स्वत:ला अभिनयाची प्रचंड आवड आहे आणि वयाची नव्वदीनंतरही अभिनय करण्याची माझी इच्छा आहे. मला ते जमेल,' असा आशावादही तिनं बोलून दाखवला.  

आलिया भट्टचा जन्म १५ मार्च १९९३ रोजी झाला असून ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ ह्या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. तिने ‘टू स्टेट्स’, ‘शानदार’, ‘हायवे’, ‘हम्पटी शर्मा कि दुल्हनिया’, ‘कपुर अँन्ड सन्स’ ह्या चित्रपटात उल्लेखनीय काम केल आहे. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या ‘उडता पंजाब’ ह्या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.  

Web Title: I will continue acting in the nineties - Alia Bhat!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.