/>दोन वर्षांपूर्वी 'कॉफी विथ करण'शो मध्ये ऐश्वर्याचा विषय सुरू असताना इमरान ने ऐश्वर्याला 'प्लास्टिक' म्हटलं होतं. मात्र मी ऐश्वर्याचा मोठा प्रशंसक असून मस्करीत केलेल्या या टिप्पणीबाबत मी ऐश्वर्याची माफी मागणार आहे, यात काही व्यक्तिगत घेण्यासारखं नव्हतं, असे इमरान हाशमीने सांगितले. मिलन लुथरियाच्या येणाऱ्या 'बादशाहो' चित्रपटात अभिनेता अजय देवगण आणि इमरान हाशमी मुख्य भूमिकेत आहेत. ऐश्वर्याने कथा वाचल्यानंतर या चित्रपटात काम करण्यास नकार दिला आहे. कारण यात ऐश्वर्याचे जास्त सीन इमरानच्या विरोधात होते. याच आशयावरून इमरानने ऐश्वर्याची माफी मागण्याचा निर्णय घेतला आहे.