'मी न्यूड झाले होते, पण ते सारे..', पहिल्याच न्यूड सीननंतर करीना कपूरची अशी झाली होती अवस्था
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 19:20 IST2021-09-21T19:20:00+5:302021-09-21T19:20:29+5:30
अभिनेत्री करीना कपूरचा जुना इंटरव्ह्यू सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

'मी न्यूड झाले होते, पण ते सारे..', पहिल्याच न्यूड सीननंतर करीना कपूरची अशी झाली होती अवस्था
बॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर आज तिचा ४१ वा वाढदिवस साजरा करते आहे. सध्या ती नवरा सैफ अली खान आणि दोन्ही मुले तैमूर आणि जेहसोबत मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते आहे. तिथे सुट्टी एन्जॉय करतानाचा फोटो इंस्टा स्टोरीवर शेअर करत असते.
एकीकडे वाढदिवसाच्या निमित्ताने करीना कपूरवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे तर दुसरीकडे तिची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे.. या मुलाखतीत तिने तिच्या बॉलिवूडमधील प्रवास आणि स्ट्रगलबद्दल सांगितले. तिने हैराण करणारा खुलासा केला. करीनाने तिचा चित्रपट हिरोइनमध्ये तिने दिलेल्या न्यूड सीन्सबद्दलही सांगितले.
करीना कपूरने तिच्या करियरमध्ये बिकनीतील शॉट्स दिले आहेत पण तोपर्यंत न्यूड सीन कोणत्याच चित्रपटात दिलेला नव्हता. मात्र तिने मधुर भंडारकरचा चित्रपट हिरोइनमध्ये न्यूड सीन्स दिले आहेत. करीना कपूरला स्क्रीनवर न्यूड अवस्थेत पाहून तिला खूप ट्रोल केले गेले होते. या सीन्समुळे तिची खूप बदनामी झाली होती जी तिला अजिबात सहन झाली नव्हती.
करीना कपूरने हिरोइन चित्रपटातील न्यूड सीन्सबद्दल सांगितले होते की, मी या सीन्ससाठी माझे शंभर टक्के दिले होते. ही भूमिका माझ्या पाच सर्वोत्कृष्ट भूमिकांपैकी एक आहे. लोक काय म्हणतात, जे काही होते ते चित्रपटात होते आणि जे काही मी केले त्यासाठी मला स्वतःचा अभिमान वाटतो.
ती पुढे म्हणाली होती की, मी या चित्रपटासाठी न्यूड झाली होती. मी जे काही केले ते चित्रपटात गरजेचे होते मात्र हे सर्व भयावह होते. हे सीन केल्यानंतर मी खूप घाबरली होती.