"अरिजीत सिंहने निवृत्ती का घेतली मला माहित आहे!" लोकप्रिय अभिनेता-गायकाने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 12:19 IST2026-02-03T12:18:34+5:302026-02-03T12:19:25+5:30

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक अरिजीत सिंग याने पार्श्वगायनातून निवृत्ती घेण्याची घोषणा करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. आता यावर प्रसिद्ध अभिनेत्याने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे

I know why Arijit Singh retired from playback singing Big revelation from actor singer palash sen | "अरिजीत सिंहने निवृत्ती का घेतली मला माहित आहे!" लोकप्रिय अभिनेता-गायकाने केला खुलासा

"अरिजीत सिंहने निवृत्ती का घेतली मला माहित आहे!" लोकप्रिय अभिनेता-गायकाने केला खुलासा

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक अरिजीत सिंग याने पार्श्वगायनातून निवृत्ती घेण्याची घोषणा करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. चाहते आणि सेलिब्रिटी अजूनही या धक्क्यातून सावरलेले नसतानाच, प्रसिद्ध गायक आणि 'युफोरिया' बँडचे संस्थापक पलाश सेन यांनी यावर दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे. "अरिजीतने हा निर्णय का घेतला, हे मला माहित आहे," असे म्हणत त्यांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे.

पलाश सेन यांची इंस्टाग्राम पोस्ट

पलाश सेन यांनी इंस्टाग्रामवर एक सविस्तर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी आपल्या कारकिर्दीतील सुरुवातीच्या संघर्षाचा उल्लेख केला. त्यांनी लिहिले की, "२४ वर्षांपूर्वी २ फेब्रुवारी रोजी माझा पहिला चित्रपट 'फिलहाल' प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट फ्लॉप ठरला आणि समीक्षकांनी माझ्यावर कडाडून टीका केली होती. चित्रपटसृष्टीतील अनेक लोकांनी मला ट्रोल केले, पण मला मुळात चित्रपटात अभिनय करण्यात रसच नव्हता. मला फक्त गुलजार साहेबांनी लिहिलेले आणि अनु मलिक यांनी संगीतबद्ध केलेले गाणे गायचे होते."


अरिजीतच्या निर्णयावर भाष्य

अरिजीत सिंगच्या निवृत्तीवर बोलताना पलाश सेन पुढे म्हणाले, "माझा भाऊ अरिजीत फिल्म प्लेबॅक का सोडत आहे, याचे कारण मला माहित आहे. अनेक वर्षांपूर्वी मी सुद्धा याच वाटेवर होतो आणि मी स्वतःचा वेगळा मार्ग निवडला होता. आता ज्या मार्गावर अरिजीत चालणार आहे, तोच मार्ग मी आधीच निवडला होता." पलाश सेन यांनी सुचवले की, बॉलिवूडमधील कामाच्या पद्धती किंवा वैयक्तिक आवडीमुळे कलाकारांना अशा प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात.

अरिजीत सिंगची निवृत्तीची घोषणा अरिजीत सिंगने गेल्या महिन्यात नवीन वर्षाच्या सुरुवातीला इंस्टाग्रामवर पोस्ट करत निवृत्ती जाहीर केली होती. त्याने म्हटले होते की, "आता मी पार्श्वगायक म्हणून कोणतेही नवीन काम करणार नाही. हा एक शानदार प्रवास होता. पण आता मला काहीतरी नवीन करायचे आहे." अरिजीतने हे स्पष्ट केले की तो संगीत निर्मिती सुरूच ठेवणार आहे, परंतु चित्रपटांसाठी गाणी गाणे थांबवत आहे.

अरिजीतच्या या निर्णयामुळे त्याचे लाखो चाहते नाराज झाले असले, तरी पलाश सेन यांच्यासारख्या वरिष्ठ गायकाने त्याचे समर्थन केल्यामुळे आता या विषयावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. चित्रपटसृष्टीतील अंतर्गत राजकारण किंवा कामाचा ताण यामुळेच अरिजीतने हा टोकाचा निर्णय घेतला असावा, असा अंदाजही वर्तवला जात आहे.

Web Title : अरिजीत सिंह के संन्यास का कारण गायक पलाश सेन ने बताया!

Web Summary : गायक अरिजीत सिंह के संन्यास से कई लोग हैरान हैं। पलाश सेन उनके फैसले का समर्थन करते हैं, बॉलीवुड के दबावों का संकेत देते हैं। सेन ने वर्षों पहले इसी तरह के करियर का सामना किया था। अरिजीत संगीत निर्माण पर ध्यान केंद्रित करेंगे।

Web Title : Arijit Singh's retirement reason revealed by singer Palash Sen!

Web Summary : Singer Arijit Singh's retirement shocked many. Palash Sen supports his decision, hinting at Bollywood's pressures. Sen faced similar career crossroads years ago. Arijit will focus on music production.