ऐकलं का प्रियंका चोपडाला लहानपणी बनायचे होते ‘कामवाली बाई’, विश्वास बसत नसेल तर व्हिडीओ बघा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2017 13:55 IST2017-08-04T12:25:26+5:302017-08-13T13:55:08+5:30
आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्येच नव्हे तर हॉलिवूडमध्येही स्वत:चे स्थान निर्माण करणारी देसी गर्ल प्रियंका चोपडा हिची लहानपणीची इच्छा जर तुम्ही ऐकली तर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

ऐकलं का प्रियंका चोपडाला लहानपणी बनायचे होते ‘कामवाली बाई’, विश्वास बसत नसेल तर व्हिडीओ बघा !
आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्येच नव्हे तर हॉलिवूडमध्येही स्वत:चे स्थान निर्माण करणारी देसी गर्ल प्रियंका चोपडा हिची लहानपणीची इच्छा जर तुम्ही ऐकली तर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. होय, प्रियंकाने एका व्हिडीओत याबाबतचा खुलासा केला आहे. प्रियंका म्हणते की, लहानपणी तिला घरकाम करणारी महिला बनायचे होते. प्रियंकाची ही इच्छा अनेकांना धक्का देणारीच म्हणावी लागेल. कारण जगभरात कोट्यवधी प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळविणारी प्रियंका कधी काळी असा विचार करीत होती, हे न पटणारे असल्याच्या प्रतिक्रिया तिच्या व्हिडीओला मिळत आहेत.
वास्तविक, प्रियंकाने हा खुलासा BULD LDN ला मुलाखत देताना केला आहे. व्हिडीओमध्ये प्रियंका तिच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना म्हणते की, ‘मला लहानपणी घरकाम करणारी महिला बनायचे होते. कारण मला साफसफाई आणि झाडू मारायला खूपच आवडत असे. पुढे बोलताना देसी गर्ल प्रियंका म्हणतेय की, मी लहानपणी माझ्या घरातील फरशी नियमितपणे साफ करीत असे. यामध्ये मला काहीही वाईट वाटत नाही. आजही मी माझ्या घराची स्वच्छता स्वत:च करीत असल्याचे प्रियंका सांगते. प्रियंकाचे हे वक्तव्य अनेकांना आश्चर्यचकीत करणारे वाटत असले तरी, स्वच्छतेबद्दल तिच्यात असलेली जागरूकता नक्कीच कौतुकास्पद म्हणावी लागेल.
खरं तर प्रियंकाची ही बाब आणखी एक गोष्ट स्पष्ट करते. ती म्हणजे यशाच्या उंच शिखरावर असतानाही प्रियंका जमिनीवर आहे. सध्या प्रियंका तिच्या हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. ‘बेवॉच’ या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये डेब्यू करणाºया प्रियंकाकडे सध्या बºयाचशा हॉलिवूडपटांच्या आॅफर्स आहेत. याशिवाय बॉलिवूडमध्येही ती अनेक प्रोजेक्टवर काम करीत आहे. ‘जय गंगाजल’ या चित्रपटात तिला अखेरीस बघितले होते. आता पुन्हा एकदा तिने एखाद्या दमदार बॉलिवूडपटातून पुनरागमन करावे अशी तिच्या चाहत्यांची इच्छा आहे. दरम्यान, प्रियंकाचा हा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत असून, तिच्या या अजब इच्छेवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.