'गोविंदासोबत फोटोशूट केलं पण..'; काजोलने सांगितला 'त्या' चित्रपटाचा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 15:33 IST2021-09-01T13:57:41+5:302021-09-01T15:33:32+5:30

Govinda and kajol never worked together: अलिकडेच झालेल्या एका मुलाखतीत काजोलने गोविंदासोबत काम न करण्यामागचं कारण स्पष्ट केलं आहे.

'I did a photoshoot with Govinda but ..'; Kajol shared her experience of 'that' movie | 'गोविंदासोबत फोटोशूट केलं पण..'; काजोलने सांगितला 'त्या' चित्रपटाचा अनुभव

'गोविंदासोबत फोटोशूट केलं पण..'; काजोलने सांगितला 'त्या' चित्रपटाचा अनुभव

ठळक मुद्दे१९९४ मध्ये 'जंगली' या चित्रपटासाठी काजोल व गोविंदा या दोघांची मुख्य भूमिकेसाठी निवड करण्यात आली होती.

९० चं दशक गाजवणाऱ्या काजोल आणि गोविंदा या कलाकारांना कोणी ओळखत नाही असं म्हणणारा क्वचित एखादाच व्यक्ती असेल. या दोन्ही कलाकारांनी त्याकाळी तुफान लोकप्रियता मिळवली. विशेष म्हणजे या दोन्ही कलाकारांची लोकप्रियता पार सातासमुद्रापारपर्यंत पोहोचली आहे. मात्र, यशाचं शिखर सर करणाऱ्या या दोन्ही कलाकारांनी अद्यापही एकत्र स्क्रीन शेअर केलेली नाही. अलिकडेच झालेल्या एका मुलाखतीत काजोलनेगोविंदासोबत काम न करण्यामागचं कारण स्पष्ट केलं आहे.

"आम्ही दोघांनीही एक चित्रपट साइन केला होता. मात्र, दुर्दैवाने तो चित्रपट कधीच पूर्ण झाला नाही. या चित्रपटासाठी फोटोशूटदेखील केलं होतं. परंतु, त्यानंतर चित्रपटाचं चित्रीकरण बंद झालं. विशेष म्हणजे एकही दिवस या चित्रपटाचं चित्रीकरण झालं नाही. या चित्रपटाचं नाव जंगली असं होतं. आम्ही दोघांनी एका नदी किनाऱ्यावर या चित्रपटासाठी फोटोशूट केलं होतं", असं काजोल म्हणाली.

'वारंवार मनाला समजावण्याचा प्रयत्न केला पण..'; 'त्याच्या' आठवणीत मलायका भावूक

पुढे ती म्हणते, "खरं सांगायचं झालं तर गोविंदा एक उत्तम कलाकार आहेत. मी कायम म्हणते, की इतरांना हसवणं ही अत्यंत अवघड गोष्ट आहे. पण, रडवणं अत्यंत सोपं. ते खरंच फार ग्रेट कलाकार आहे. त्यामुळेच कदाचित यापुढे कधीतरी त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळेल...पाहुयात."

दरम्यान, १९९४ मध्ये 'जंगली' या चित्रपटासाठी काजोल व गोविंदा या दोघांची मुख्य भूमिकेसाठी निवड करण्यात आली होती. मात्र,या चित्रपटाचं चित्रीकरण कधीच पूर्ण झालं नाही. 
 

Web Title: 'I did a photoshoot with Govinda but ..'; Kajol shared her experience of 'that' movie