‘मी केवळ भारतीय, अमेरिकन भारतीय नव्हे..’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2016 10:33 IST2016-09-21T05:03:44+5:302016-09-21T10:33:44+5:30

 प्रियांका चोप्रा हिचे करिअर स्वप्ननगरी मुंबईतच आकारास आले. त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांप्रमाणे आजही प्रियांका चोप्रा मुंबईवर प्रचंड प्रेम करते. सध्या ...

'I am not Indian, not American Indians ..' | ‘मी केवळ भारतीय, अमेरिकन भारतीय नव्हे..’

‘मी केवळ भारतीय, अमेरिकन भारतीय नव्हे..’

 
्रियांका चोप्रा हिचे करिअर स्वप्ननगरी मुंबईतच आकारास आले. त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांप्रमाणे आजही प्रियांका चोप्रा मुंबईवर प्रचंड प्रेम करते. सध्या ती अमेरिकन टीव्ही शो ‘क्वांटिको’ च्या दुसऱ्या  सीजनचे शूटिंग करत आहे.

पण, ती म्हणते, ‘ सध्या मी अमेरिकेत जरी असले तरीही मी केवळ एक भारतीय आहे. अमेरिकन भारतीय मी कधीच नसणार. माझ्यासाठी पैसा महत्त्वाचा नाही. मी जे काम करते त्यासाठी मी केवळ फी घेते. त्यासाठी मी प्रचंड मेहनत घेते.

मी जेव्हा शाळेत जात असे तेव्हा टीव्हीवर कुठलाही भारतीय कलाकार मालिकांमध्ये दिसायचा नाही. पण, मला आनंद होतोय की, माझ्या निमित्ताने तरी भारतीय कलाकाराचा झेंडा उंचावला. त्यासोबतच मी आॅस्करपर्यंतही गेले. मला मी भारतीय असण्याचा प्रचंड अभिमान आहे. त्यामुळे मला अमेरिकन भारतीय होण्याची मुळीच इच्छा नाही.’

Web Title: 'I am not Indian, not American Indians ..'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.