हुमा कुरेशी घेते आपल्या गुरुंचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2016 18:01 IST2016-06-29T12:31:11+5:302016-06-29T18:01:25+5:30
हुमा कुरेशीच्या अभिनयाचे कौतुक नेहमीच केले जाते. तिने आपल्या कारकिदीर्ची सुरुवात रंगमंचावरून केलेली आहे. तिच्या आजवरच्या यशात तिचे गुरू ...
.jpg)
हुमा कुरेशी घेते आपल्या गुरुंचा सल्ला
ुमा कुरेशीच्या अभिनयाचे कौतुक नेहमीच केले जाते. तिने आपल्या कारकिदीर्ची सुरुवात रंगमंचावरून केलेली आहे. तिच्या आजवरच्या यशात तिचे गुरू एन.के.शर्मा यांचा मोठा हात असल्याचे तिचे म्हणणे आहे. शर्मा हे बॉलिवुडमधील अनेक दिग्गजांचे गुरू आहेत. हुमा तिच्या करियरसंबंधित कोणताही निर्णय शर्मांना विचारल्याशिवाय घेत नाही. हुमाला सध्या दोन चित्रपटांविषयी विचारण्यात आले असून ती शर्मा यांच्यासोबत याबाबत चर्चा करत आहे. दिल्लीमध्ये असताना शर्मा यांच्याकडेच हुमाने अभिनयाचे धडे गिरवलेले आहेत. त्यामुळे मी कोणत्याही चित्रपटाबाबत द्विधा मन:स्थतीत असेल तर सगळ्यात पहिल्यांदा पंडितजींनाच फोन करते असे हुमा सांगते.