Hritik Roshan: अशी सुरू झाली हृतिक आणि सबाची Love Story, अनेक दिवसांपासून करताहेत डेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 18:51 IST2022-02-22T18:43:41+5:302022-02-22T18:51:31+5:30
Hritik Roshan: बॉलिवूडचा हँडसम हंक हृतिक रोशन सध्या त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे.

Hritik Roshan: अशी सुरू झाली हृतिक आणि सबाची Love Story, अनेक दिवसांपासून करताहेत डेट
मुंबई: बॉलिवूडमध्ये हँडसम हंक म्हणून ओळखला जाणारा अभिनेता हृतिक रोशन(Hritik Roshan) सध्या त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे. सध्या तो अभिनेत्री आणि गायिका सबा आझाद (Saba Azad)ला डेट करत असल्याच्या बातम्या येत आहेत. दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नुकतंच सबा आझाद रोशन कुटुंबासोबत लंच करताना दिसली होती. यानंतर दोघांच्या लव्ह लाईफमध्ये लोकांचा इंट्रेस्ट वाढला. अनेकांना त्यांची 'लव्हस्टोरी' कशी सुरू झाली याबाबत उत्सुकता आहे.
ट्विटरवरुन सुरू झाले बोलणे
सुरुवातीला दोघांची भेट कोणत्यातरी डेटिंग अॅपच्या माध्यमातून झाली असावी, असा अंदाज बांधला जात होता. पण, एका रिपोर्टनुसार, दोघांची ओळख ट्विटरवरून सुरू झाली आहे. हृतिकने सबा आणि इतर काही रॅपर्सचा व्हिडिओ लाइक केला होता, त्यावर सबाने हृतिकला 'धन्यवाद' म्हटले होते. त्यानंतर दोघांचे एकमेकांशी बोलणे सुरू झाले आणि ओळख वाढत गेली.
अनेक दिवसांपासून सुरू आहे डेटींग
हृतिक रोशन आणि सबा गेल्या 2-3 महिन्यांपासून एकमेकांना डेट करत असल्याची माहिती आहे. या दोघांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये दोघे एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसले होते. तेव्हापासून त्यांच्या नात्याबद्दल चर्चा सुरू झाली. त्यानंतर आता सबा रोशन कुटुंबासोबत दिसल्यानंतर त्यांच्या रिलेशनशीपच्या चर्चांनी जोर धरला आहे.