कंगनाला पाठींबा देणाऱ्यांंना हृतिकचे उत्तर !!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2016 20:39 IST2016-07-12T14:56:22+5:302016-07-12T20:39:44+5:30
जेव्हा सत्य आपल्या बाजूने असते, तेव्हा कुणाच्याही पाठींब्याची गरज उरत नाही, असे मत आहे हृतिक रोशन याचे. कंगना व ...

कंगनाला पाठींबा देणाऱ्यांंना हृतिकचे उत्तर !!
ज व्हा सत्य आपल्या बाजूने असते, तेव्हा कुणाच्याही पाठींब्याची गरज उरत नाही, असे मत आहे हृतिक रोशन याचे. कंगना व त्याच्या वादात कंगनाला पाठींबा देणाºया बॉलिवूडमधील सहकाºयांना उद्देशून हृतिकने ही प्रतिक्रिया दिली आहे. हृतिक रोशन आणि कंगना रानोट यांच्यातील वाद आता कुणापासूनही लपून राहिलेला नाही. कंगनाने एका मुलाखतीत हृतिकला ‘सिली एक्स’ म्हटले आणि हृतिकने त्याचे उत्तर म्हणून कंगनाला कायदेशीर नोटीस बजावली. कंगनानेही कायदेशीर नोटीस धाडत, हृतिकला जशास तसे उत्तर दिले. यानंतर हृतिक व कंगना दोघेही एकमेकांवर बेछूट आरोप करताना दिसले. मीडियामध्ये याचे चर्वितचर्वण झाले. या वादात बॉलिवूडमधील काही जण कंगनाच्या बाजूने उभे राहिले. कंगनाला पाठींबा देणाºया या अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींवर हृतिक नाराज असल्याच्या बातम्या अलीकडे आल्यात. प्रियंका, विद्या,रणवीर सिंग, सलमान खान, करण जोहर या सर्वांवर हृतिक नाराज असल्याचे कळते. आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी हृतिकने प्रियंका, विद्या व करणला अतिशय हळवे मॅसेज पाठवल्याचीही बातमी आली. आज ‘मोहेंजोदडो’च्या एका प्रमोशन इव्हेंटमध्ये या सगळ्यांबद्दल हृतिकला छेडले असता हृतिकने अतिशय अनपेक्षित प्रतिक्रिया दिली. जेव्हा सत्य आपल्या बाजूने असते, तेव्हा कुणाच्याही पाठींब्याची गरज उरत नाही, असे हृतिक यावेळी म्हणाला..