करणला रेड सिग्नल दाखवून हृतिकचा कुणाला ग्रीन सिग्नल ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2016 12:25 IST2016-06-02T06:55:52+5:302016-06-02T12:25:52+5:30

अभिनेता हृतिक रोशननं करण जोहरच्या सिनेमात काम करण्यास नकार दिला. करणच्या कलंक सिनेमाला हृतिकचा रेड सिग्नल, मात्र राकेश ओमप्रकाश ...

Hrithik's Green Signal showing Karan a Red Signal? | करणला रेड सिग्नल दाखवून हृतिकचा कुणाला ग्रीन सिग्नल ?

करणला रेड सिग्नल दाखवून हृतिकचा कुणाला ग्रीन सिग्नल ?

िनेता हृतिक रोशननं करण जोहरच्या सिनेमात काम करण्यास नकार दिला. करणच्या कलंक सिनेमाला हृतिकचा रेड सिग्नल, मात्र राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या सिनेमाला मात्र ग्रीन सिग्नल. आपल्या नव्या सिनेमासाठी राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी हृतिककडे विचारणा केली. हृतिकनं या सिनेमाला लगेच होकार दिलाय. सध्या राकेश मेहरा मिर्झिया सिनेमात बिझी आहेत. या सिनेमानंतर ते हृतिकसोबतच्या सिनेमावर काम करण्यास सुरुवात करणार आहेत.. त्यातच हृतिकसुद्धा मोहन्जेंदडो आणि काबिल सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. हे शुटिंग आटोपल्यानंतर हृतिक आणि राकेश ओमप्रकाश मेहरा नव्या सिनेमावर काम करण्यास सुरुवात करणार आहेत.. मात्र या सगळ्या घडामोडीमुळं करण आणि हृतिकमधील बिघडलेल्या संबंधांवर एकप्रकारे शिक्कामोर्तबच केलंय..
करणला रेड सिग्नल दाखवून हृतिकचा कुणाला ग्रीन सिग्नल ?


 

Web Title: Hrithik's Green Signal showing Karan a Red Signal?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.