​हृतिकचे अफेअर्स.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2016 14:58 IST2016-03-22T21:56:12+5:302016-03-22T14:58:54+5:30

ह्रतिक रोशन पुन्हा वादाच्या भोवºयात आहे. कंगना सोबतचे त्याचे रिलेशनशिप आणि एकमेकांना नोटिस देण्यावरून दोन्हीही एकमेकांवर लांच्छन लावण्याचा प्रयत्न ...

Hrithik's Affairs ..... | ​हृतिकचे अफेअर्स.....

​हृतिकचे अफेअर्स.....

रतिक रोशन पुन्हा वादाच्या भोवºयात आहे. कंगना सोबतचे त्याचे रिलेशनशिप आणि एकमेकांना नोटिस देण्यावरून दोन्हीही एकमेकांवर लांच्छन लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. ह्रतिक रोशनचे वादात फसणे हा काही पहिलाच प्रसंग नाही. गेल्या वर्षी त्याने जेव्हा सुजान सोबतचे १५ वर्षा पुर्वीचे लग्न तोडण्याचे जाहिर केले, तर प्रत्येकाला आश्चर्यचा धक्काच बसला होता. व्यक्तिगत कारणाने ह्रतिकने हे कधी जाहिर नाही केले की, कोणत्या कारणाने त्याच्या पत्नीला  घटस्पोट द्यावा लागला.  मात्र त्याच्या जवळच्या सूत्रानुसार हे नक्की संकेत मिळाले की, ‘काईट’ चित्रपटातील विदेशी नायिका बारबरा मोरी सोबतच्या अफेरवरू न ह्रतिकने आपले लग्न तोडले.



इथपर्यंत सांगण्यात येत होते की, घटस्पोटानंतरही ह्रतिक सतत बारबराच्या संपर्कात होता. आणि आता हा योगायोगच मानावा लागेल की, ‘काईट’च्या एका नायिकेसोबतच्या अफेरनंतर काईटची दुसरी हीरोइन कंगना सोबतच्या अफेरवरून वादात फसला आहे.



मध्यंतरी हे देखील ऐकण्यात आले होेते की, ‘जिंदगी न मिले दोबारा’ च्या शूटिंग दरम्यान ह्रतिक त्या चित्रपटाची नायिका कॅटरीनाच्या जवळ आले होते. इथपर्यंत सांगण्यात आले की, फक्त कॅटरीना सोबत राहण्यासाठी ह्रतिकने ‘बैंग बैंग’ चित्रपटात काम केले, कारण तो कॅटरीनासोबत जास्तीत जास्त वेळ घालवू शकेल. मात्र कॅटरीनाचे नाव त्या काळात रणबीर कपूरसोबत जुळून गेले होते. यामुळे ह्रतिकसोबतचे तिचे रिलेशनशिप लक्षात आले नाही.
लग्नाअगोदर ह्रतिकचे नाव सर्वात वेगाने करीना कपूर सोबत जुळले  होते. करीना कपूर सोबत ह्रतिकने सुभाष घईच्या ‘यादें’ चित्रपटापासून राजश्रीचा ‘मैं प्रेम की दीवानी’, यशराजचा ‘मेरे दोस्त की शादी’ आणि करण जौहरचा ‘कभी खुशी कभी गम’ मध्ये काम केले होते. आणि त्या काळात तो करीनाचा आवडीचा नायक होता. मात्र करीनाचे नाव शाहिद कपूरशी जुळले आणि त्यानंतर ह्रतिकचे लग्न झाले, म्हणून हे प्रकरणच दाबले गेले. 

 

Web Title: Hrithik's Affairs .....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.