हृतिक रोशनच्या 'क्रिश ४'मध्ये लागू शकते 'या' अभिनेत्रींची वर्णी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 16:52 IST2017-09-27T11:22:32+5:302017-09-27T16:52:32+5:30

नुकत्याच आलेल्या बातमीनुसार हे निश्चित झाले आहे कि राकेश रोशन यांनी क्रिशच्या चौथ्या भागासाठी आपले काम सुरू केले आहे. ...

Hrithik Roshan's 'Krrish 4' can be used in 'The Actress' | हृतिक रोशनच्या 'क्रिश ४'मध्ये लागू शकते 'या' अभिनेत्रींची वर्णी

हृतिक रोशनच्या 'क्रिश ४'मध्ये लागू शकते 'या' अभिनेत्रींची वर्णी

कत्याच आलेल्या बातमीनुसार हे निश्चित झाले आहे कि राकेश रोशन यांनी क्रिशच्या चौथ्या भागासाठी आपले काम सुरू केले आहे. या चित्रपटात हृतिक आपल्याला हिरो आणि व्हिलन ह्या दोन्ही भूमिकेत दिसणार आहे. या बातमीनंतर सगळ्यांना हीच उत्सुकता आहे की याची कथा काय असणार आहे आणि यात हृतिक बरोबर कोणती हिरोईन दिसू शकते. पण सध्या याचा खुलासा झाला नाही पण खालील ५ हिरोइन्सचा विचार या 'क्रिश ४' साठी करण्यात येतो आहे.  

प्रियांका चोप्रा
बॉलिवूडची देसी गर्ल  प्रियांका चोप्रा  याआधी क्रिशमध्ये झळकली होती आणि तिला 'क्रिश ४' साठी विचारण्यात यायची दाट शक्यता आहे . कारण हृतिक यात डबलरोल करणार आहे त्यात प्रियांकाचा पण डबल रोल असेल तर फारच उत्तम असेल बाकी प्रियांकाच्या अभिनयाबाबत तर काहीच शंका नाही.

तापसी पन्नू
तापसी पन्नू सध्या बॉलिवूडमधली अशी अभिनेत्री आहे की ती कोणतेही पात्र सहज साकारू शकते. हृतिक आणि तिची जोडी मोठ्या पडदयावर फारच शोभून दिसेल.

आलिया भट्ट
आलिया भट्ट सध्या न्यू जनरेशनची लाडकी अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत सर्व प्रकारचे रोल केले आहेत आणि ते प्रेक्षकांना आवडले देखील आहेत.  हल्लीच तिने आर्यन मुखर्जीचा सुपरहिरो चित्रपट साइन केला आहे त्यामुळे तिला 'क्रिश ४'साठी विचारण्यात येण्याची शक्यता जास्त आहे.

कॅटरिना कैफ
कॅटरिना कैफ आणि हृतिक यांनी आधी सुद्धा एकत्र स्क्रिन शेअर केली आहे  आणि त्यांची केमिस्ट्री देखील प्रेक्षकांना आवडली  आहे . ज्या तऱ्हेने ते दोघे बँग बँगमध्ये दिसले आणि उत्तम अभिनय साकार केला ते बघता कॅटरिनाचा क्रीश ४ साठी नंबर लागणे काही मोठी गोष्ट नाही.

जॅकलिन फर्नांडिस
जॅकलिन फर्नांडिसचे नाव यासाठी घेत आहे कारण ती 'रेस ३' सारख्या ऍक्शन चित्रपटात काम करते आहे आणि ती स्टंट करायला नेहमीच तयार असते.  या सगळ्या गोष्टी लक्षात घेता तिची 'क्रिश ४' मध्ये वर्णी लागण्याचा शक्यता आहे. 

ALSO READ : राकेश ओम प्रकाश मेहरांच्या चित्रपटात दिसणार ह्रतिक रोशन?

Web Title: Hrithik Roshan's 'Krrish 4' can be used in 'The Actress'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.