हृतिक रोशनची बहीण करणार बॉलिवूडमध्ये डेब्यू, सौंदर्यात देते करिना, कतरिनाला देखील मात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 18:05 IST2020-05-30T18:05:01+5:302020-05-30T18:05:48+5:30
हृतिकने सोशल मीडियावर त्याच्या बहिणीचे फोटो पोस्ट केले आहेत. ती अतिशय ग्लॅमरस आणि स्टायलिश असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

हृतिक रोशनची बहीण करणार बॉलिवूडमध्ये डेब्यू, सौंदर्यात देते करिना, कतरिनाला देखील मात
बॉलिवूडमध्ये स्टार किडने येणे यात काही नवीन नाही. राकेश रोशन यांनी अनेक वर्षं चित्रपटसृष्टीत एक अभिनेता, दिग्दर्शक म्हणून काम केले. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांचा मुलगा हृतिक रोशनने देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. राकेश रोशन यांनीच कहो ना प्यार है या चित्रपटाद्वारे हृतिकला लाँच केले. आज हृतिकने बॉलिवूडमध्ये आपले एक स्थान निर्माण केले आहे. आता रोशन कुटुंबातील आणखी एक सदस्य बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. हृतिकनेच सोशल मीडियाद्वारे ही गोष्ट सगळ्यांना सांगितली आहे.
हृतिक रोशनची चुलत बहीण पश्मीना आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. ती दिसायला अतिशय सुंदर असून हृतिकनेच सोशल मीडियावर तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत. तिचे हे फोटो पाहून ती करिना कपूर, कतरिना कैफ, आलिया भट, दीपिका पादुकोण या आजच्या आघाडीच्या अभिनेत्रींना टक्कर देणार अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
हृतिकने शेअर केलेल्या पश्मीनाच्या फोटोंवर अनेक जणांनी कमेंट केली असून तिचा ग्लॅमरस आणि स्टायलिश अंदाज त्यांना प्रचंड आवडला असल्याचे ते कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. हृतिकने या फोटोसोबत लिहिले आहे की, पश्मीना मला तुझ्याविषयी प्रचंड अभिमान आहे. तू आमच्या कुटुंबियांचा भाग असल्याबद्दल मी देवाचे नेहमीच आभार मानतो. तू चित्रपटात काम करो अथवा नको करू तू नेहमीच स्टार आहेस...
आता हृतिकची बहीण पश्मीना कोणत्या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री करते याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.