​हृतिक रोशन - कंगना राणौत वाद : बड्या लोकांनी दिला होता कंगनाला ‘हा’ सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2017 16:55 IST2017-02-21T11:25:02+5:302017-02-21T16:55:02+5:30

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतचा बहुचर्चित ‘रंगून’हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे प्रमोशनात व्यस्त असलेल्या कंगनाने काही दिवसांआधी ...

Hrithik Roshan - Kangna Ranaut controversy: This is the advice given to Kangana by the big people | ​हृतिक रोशन - कंगना राणौत वाद : बड्या लोकांनी दिला होता कंगनाला ‘हा’ सल्ला

​हृतिक रोशन - कंगना राणौत वाद : बड्या लोकांनी दिला होता कंगनाला ‘हा’ सल्ला

लिवूड अभिनेत्री कंगना राणौतचा बहुचर्चित ‘रंगून’हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे प्रमोशनात व्यस्त असलेल्या कंगनाने काही दिवसांआधी हृतिकने माझे करिअर संपविण्याचा प्रयत्न केला होता असा आरोप लावला होता. मागील वर्षी सर्वाधिक चर्चेत असलेला कंगना-हृतिक रोशन यांच्यातील प्रेमाचा विषय आता तिला भूतकाळ वाटू लागला असून यात आता काहीच उरले नसल्याचे मत कंगनाने व्यक्त केले. कंगनाच्या मते काही बड्या लोकांनी मला हा आमच्या दोघांमधील वाद चव्हाट्यावर आणू नये असा सल्ला दिला होता. 

मागील वर्षी अभिनेत्री कंगना रानौत आणि अभिनेता हृतिक रोशन यांच्यातील ‘सिली एक्स’ या एका शब्दामुळे चर्चेत आला होता. एका मुलाखती दरम्यान कंगनाने हृतिक रोशनला ‘सिली एक्स’ म्हंटले होते. यानंतर दोघांमधील वाद चिघळत गेला. हृतिकने कोर्टाचा आधार घेत कंगनाला कायदेशीर नोटीस पाठविली होती. यासोबतच हृतिक रोशनने सार्वजनिक रित्या कंगनाने माफ ी मागावी असे सांगून त्यांच्यातील कोणत्याही संबंधाचे खंडन केले होते. आता पुन्हा कंगनाने हा वाद उकरून काढताना बॉलिवूडमधील अनेक मोठ्या कलावंतांनी कोणतिही गोष्टी सर्वाजनिक करण्यापासून दूर राहवे असा सल्ला दिला होता. 




पीटीआयशी बोलताना कंगना म्हणाली, मला अनेक बड्या लोकांनी घरी बोलाविले होते. मला सांगण्यात आले की मी जर माझे तोंड उघडले तर माझे करिअर खराब होऊ शकते. आम्ही आमचा वाद बंद दरात सोडवावा असे अनेकांनी मला सांगितले होते. मात्र आता माझ्यासाठी या सर्व गोष्टी महत्त्वाच्या ठरत नाहीत कारण आता हा वाद माझा भूतकाळ आहे. हा विषय माझ्यासाठी संपलेला आहे, याची कोणतिही प्रासंगिकता राहिलेली नाही. कंगना म्हणाली, माझ्यासाठी तोप काळ कठीण होता, मात्र मी घाबरली नाही, कारण मला माहित होते मी काहीच चुकीचे केलेले नाही. असे सांगण्यात येते की कंगना व हृतिकमध्ये ‘क्रिश ३’ शूटिंग दरम्यान प्रेम फुलले होते. कंगनाचा आगामी रंगून हा चित्रपट येत्या २४ फेब्रुवारीला रिलीज होत आहे. 
     

Web Title: Hrithik Roshan - Kangna Ranaut controversy: This is the advice given to Kangana by the big people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.