Hrithik Roshan : हृतिक रोशन यावर्षी दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर ? जाणून घ्या अभिनेत्याचे वडील काय म्हणाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2023 14:54 IST2023-03-04T14:50:43+5:302023-03-04T14:54:19+5:30
हृतिक आणि सबा लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. यावर राकेश रोशन यांनी मौन सोडलं आहे.

Hrithik Roshan : हृतिक रोशन यावर्षी दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर ? जाणून घ्या अभिनेत्याचे वडील काय म्हणाले
Rakesh Roshan On Hrithik Saba Wedding Rumours: अभिनेता हृतिक रोशन आणि सबा आझाद अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या कपलला अनेकदा इव्हेंटमध्ये एकत्र पाहिले जाते. हृतिक आणि सबा लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. आता हृतिकचे वडील राकेश रोशन यांनी या अफवांवर मौन सोडले असून आपल्याला आपल्या मुलाच्या लग्नाबाबत काहीही माहिती नसल्याचे स्पष्ट केले आहे.
काय म्हणाले राकेश रोशन?
स्पॉटबॉयशी बोलताना राकेश रोशन म्हणाले, “मी अद्याप याबद्दल काहीही ऐकले नाही. कुटुंबाच्या जवळच्या एका सूत्राने देखील शेअर केले, “मीडिया त्यांना (हृतिक आणि सबा) त्यांचे नातं पुढे घेऊन जाण्यासाठी स्पेस का देत नाही? मैत्री झाली नाही की लग्नाची चर्चा सुरू झाली. ते एकमेकांना ओळखू लागले आहेत. हृतिक आता लहान मुलगा राहिलेला नाही त्याच्यावर अनेक जबाबदाऱ्या आहेत, यात मुलांचाही समावेश आहे. त्यांना एका कोपऱ्यात ढकलणे अत्यंत बेजबाबदारपणाचे आहे.
हृतिक आणि सबा खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी त्यांचं नातं ऑफिशियल केलं. ते अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांसाठी पोस्ट शेअर करतात. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, अभिनेता आणि सबा यांची भेट एका कॉमन फ्रेंडद्वारे झाली होती.
वर्क फ्रंटवर, हृतिक रोशन दीपिका पादुकोण, अनिल कपूर आणि अक्षय ओबेरॉय यांच्यासोबत 'फाइटर'मध्ये दिसणार आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. हृतिक शेवटचा सैफ अली खानसोबत 'विक्रम वेध'मध्ये दिसला होता.