श्रद्धा कपूरचं भुरळ पाडणारं सौंदर्य, हृतिक रोशनच्या 'त्या' कमेंटने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 18:34 IST2023-10-19T18:33:26+5:302023-10-19T18:34:06+5:30

नुकतंच श्रद्धाने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. या फोटोवर हृतिक रोशनने केलेल्या कमेंटनं सगळ्याचं लक्ष वेधलं. 

Hrithik Roshan comment on Shraddha Kapoor photo drew attention | श्रद्धा कपूरचं भुरळ पाडणारं सौंदर्य, हृतिक रोशनच्या 'त्या' कमेंटने वेधलं लक्ष

श्रद्धा कपूरचं भुरळ पाडणारं सौंदर्य, हृतिक रोशनच्या 'त्या' कमेंटने वेधलं लक्ष

श्रद्धा कपूर ही बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. अनेक सुपरहिट चित्रपट तिने दिले आहेत. दमदार अभिनयाचे आणि तिच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. श्रद्धा कपूर सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.  नुकतंच श्रद्धाने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. या फोटोमध्ये श्रद्धाचा साधा लूक पाहायला मिळत आहे. या फोटोवर अभिनेता हृतिक रोशनने केलेल्या कमेंटनं सगळ्याचं लक्ष वेधलं. 

श्रद्धाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती उन्हात बसलेली दिसत आहेत. चेहऱ्यावर पडणाऱ्या सूर्याची किरणात तिचं सौंदर्य आणखीनच खुलून दिसतंय.  हे फोटो शेअर करताना तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'जादूप्रमाणे मलाही सूर्यप्रकाशाची गरज आहे'. श्रद्धा कपूरच्या या फोटोंवर अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. यातच हृतिक रोशनही स्वत:ला कमेंट करण्यापासून रोखू शकला नाही. श्रद्धाच्या फोटोंवर कमेंट करताना हृतिकने लिहिलं, 'तो येत आहे. त्याला सांगेन'. याला उत्तर देताना श्रद्धाने लिहिले की, 'खरंच..?...तो कधी आणि कुठे येतोय'.

श्रद्धाने  २०१३ साली 'आशिकी २' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटाने तिला लोकप्रियता मिळवून दिली. स्टार किड असलेल्या श्रद्धाने अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली. 'आशिकी २'नंतर श्रद्धा 'बाघी', 'एक व्हिलन', 'हाफ गर्लफ्रेंड', 'ओके जानू', 'छिछोरे', 'एबीसीडी २' या सुपरहिट चित्रपटांत झळकली. 'स्त्री' या चित्रपटातील तिची भूमिका प्रेक्षकांना विशेष भावली. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'तू झुठी मै मक्कार' चित्रपटात श्रद्धाने रणबीर कपूरबरोबर स्क्रीन शेअर केली होती. यातील तिची आणि रणबीर कपूरची जोडी खूपच पसंत केली गेली. 

सध्या ती तिच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. शिवाय, राजकुमार रावसोबत 'स्त्री २' या हॉरर कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. अमर कौशिक यांच्या दिग्दर्शनात बनलेल्या या चित्रपटात अपारशक्ती खुराना, अभिषेक बॅनर्जी आणि पंकज त्रिपाठी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'स्त्री २' ऑगस्ट २०२४ मध्ये थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

Web Title: Hrithik Roshan comment on Shraddha Kapoor photo drew attention