हृतिक रोशनच्या बर्थडे सेलिब्रेशनच्या फोटोंवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स, म्हणाले "बघा गरिबांनो..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 13:51 IST2026-01-12T13:50:47+5:302026-01-12T13:51:55+5:30
हृतिकच्या वाढदिवसाला 'एक्स' पत्नी अन् गर्लफ्रेंड एकत्र, फोटो चर्चेत

हृतिक रोशनच्या बर्थडे सेलिब्रेशनच्या फोटोंवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स, म्हणाले "बघा गरिबांनो..."
बॉलिवूडचा 'ग्रीक गॉड' हृतिक रोशन यानं नुकताच आपला वाढदिवस साजरा केला. जगाला भुरळ घालणारा हा अभिनेता आता आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हृतिकच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये त्याची Ex पत्नी सुजैन खान आणि त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद एकाच फ्रेममध्ये दिसत आहेत. या फोटोंवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
हृतिकने या फोटोंसोबत एक भावनिक पोस्टही लिहिली आहे. तो म्हणाला, "धन्यवाद... माझ्या कुटुंबाचे आणि मित्रांचे खूप आभार. ज्यांनी मला मेसेज केले, कॉल केले किंवा क्षणभर का होईना माझ्यासाठी प्रार्थना केली, त्या सर्वांचा मी ऋणी आहे. तुमच्यासोबत या पृथ्वीवर असणे हा माझ्यासाठी सन्मान आहे". हृतिकच्या या पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
हृतिकने शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्याचे संपूर्ण कुटुंब दिसत आहे. पण एकाच वेळी सुझान आणि सबा यांना एकत्र पाहून चाहत्यांच्या भुवया उंचावल्या. एका युजरने कमेंट केली, "बघा गरिबांनो... याला म्हणतात खरा समजूतदारपणा". तर दुसऱ्या एकाने लिहिले, "वाह! पहिलं लग्न, दुसरं प्रेम आणि सगळे एकत्र... हे फक्त हृतिकच करू शकतो". दरम्यान हृतिक रोशन शेवटचा 'वॉर २' मध्ये दिसला होता. आता चाहते त्याच्या आगामी 'क्रिश ४' चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.