संजय लीला भंसालींच्या चित्रपटात ऋतिक रोशन बनणार 'शिव' भगवान?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2017 16:08 IST2017-07-14T10:38:20+5:302017-07-14T16:08:20+5:30

पद्मावतीनंतर संजय लीला भंसाली हे शिव शंकरावर आधारित चित्रपट तयार करतायेत.लेखक अमीश त्रिपाठी यांचे प्रसिद्ध पुस्तक 'द इम्मॉर्टल्स ऑप ...

Hrithik Roshan to become 'Shiva' in Sanjay Leela Bhansali's film? | संजय लीला भंसालींच्या चित्रपटात ऋतिक रोशन बनणार 'शिव' भगवान?

संजय लीला भंसालींच्या चित्रपटात ऋतिक रोशन बनणार 'शिव' भगवान?

्मावतीनंतर संजय लीला भंसाली हे शिव शंकरावर आधारित चित्रपट तयार करतायेत.लेखक अमीश त्रिपाठी यांचे प्रसिद्ध पुस्तक 'द इम्मॉर्टल्स ऑप मेलुहा' यांचे राइट्स त्यांनी विकत घेतले आहेत.लवकरच या चित्रपटावर ते काम सुरु करणार आहेत. आधी या चित्रपटाचे राइट्स करण जोहरकडे होतो. करणने चित्रपटावर काम सुरु करत भगवान शिव शंकर यांच्या भूमिकेसाठी ऋतिक रोशन, वरुण धवन आणि टायगर श्रॉफ यांच्याशी बोलणी सुरु केली होती. मात्र आता अशी खबर येते आहे की या चित्रपटाचे राइट्स संजय लीला भंसाली यांनी विकत घेतले आहेत. ऋतिक रोशन भगवान शिव यांची भूमिका साकारणार आहे. यासंदर्भात संजय लीला भंसाली यांच्या टीमचे ऋतिक रोशनशी बोलणं सुरु आहे.  सध्या ऋतिक आपल्या फॅमिलीसोबत अमेरिकेत सुट्ट्या एन्जॉय करतो आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऋतिक या भूमिकाला घेऊन खूपच उत्सुक आहे आणि भारतात परतल्यानंतर तो या चित्रपटावर काम सुरु करणार आहे. 2010मध्ये संजय लीला भंसाली यांच्या गुजारिश या चित्रपटात त्यांने काम केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नव्हता मात्र ऋतिकच्या अभिनयाचे कौतुक केले होते ऐश्वर्या रॉयपण यात महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. सध्या संजय लीला भंसाली हे पद्मावतीच्या कामामध्ये व्यस्त आहेत. यात राणी पद्मावतीची भूमिका दीपिका पादुकोण साकारत आहे. दीपिकाच्या पतीच्या भूमिकेत शाहीद कपूर तर सुल्तान अलाउद्दीन खिलजीची भूमिका  रणवीर सिंग साकारणार आहे. दीपिकाने हा रोल करण्यासाठी 7 कोटींचे मानधान घेतले आहे. 

Web Title: Hrithik Roshan to become 'Shiva' in Sanjay Leela Bhansali's film?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.