लॉकडाऊन संपल्यावर ऋतिक रोशन करणार मोठा धमाका, फॅन्स देणार 'हे' सरप्राईज
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 15:26 IST2020-04-21T15:07:50+5:302020-04-21T15:26:14+5:30
लॉकडाऊनच्या दरम्यान अभिनेता ऋतिक रोशन आपल्या कुटुबियांसोबत क्वारांनटाईन झाला आहे.

लॉकडाऊन संपल्यावर ऋतिक रोशन करणार मोठा धमाका, फॅन्स देणार 'हे' सरप्राईज
कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या घरात आहे. त्यामुळे सेलिब्रेटी सध्या स्वत:च्या फिटनेसवर काम करतायेत. सोशल मीडियावर ते आपले वर्कआऊट व्हिडीओ शेअर करत असतात. अभिनेता ऋतिक रोशनही आपले वर्कआऊट व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत फॅन्स प्रेरित करत असतो.
लॉकडाऊनच्या दरम्यान अभिनेता आपल्या कुटुबियांसोबत क्वारांनटाईन झाला आहे. तसेच तो काम सिनेमांची स्क्रिप्ट वाचण्याचे काम देखील करतो आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार सध्या ऋतिककडे अनेक सिनेमांच्या स्क्रिप्ट आहेत. यातील काही स्क्रिप्ट ऋतिकला आवडल्या आहेत तो सतत दिग्दर्शक आणि लेखकांच्या संपर्कात आहे. रिपोर्टनुसार लॉकडाऊन संपल्यावर ऋतिक त्याच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा करण्याची शक्यता आहे. जरी ही बातमी खरी ठरली तर ऋतिकच्या फॅन्स एक प्रकारचे सरप्राईज मिळेल.
बॉलिवूडचा ग्रीक गॉड हृतिक रोशनने गतवर्षी ‘सुपर 30’ व ‘वॉर’ या सुपरहिट सिनेमांसह बॉक्स ऑफिसवर धमाकेदार वापसी केली. त्याआधी दीर्घकाळ हृतिक रूपेरी पडद्यापासून दूर होता. ‘सुपर 30’ व ‘वॉर’ या सिनेमांच्या बॉक्स ऑफिसवर हीट ठरले.लवकरच तो धर्मा प्रॉडक्शनच्या एका आगामी स्पाय थ्रीलर सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा नितीन गोखले यांच्या ‘R.N. Kao: Gentleman Spymaster’ या पुस्तकावर आधारित असल्याचे कळतेय.