​अंधाच्या अडचणींची हृतिक रोशनला झालीय जाणीव ; नेत्रदान करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2017 21:59 IST2017-01-07T21:59:37+5:302017-01-07T21:59:37+5:30

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनचा आगामी काबिल हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणारा आहे. या चित्रपटात तो अंध व्यक्तीची भूमिका साकारताना ...

Hrithik Roshan is aware of the problems of the blind; Eye donation | ​अंधाच्या अडचणींची हृतिक रोशनला झालीय जाणीव ; नेत्रदान करणार

​अंधाच्या अडचणींची हृतिक रोशनला झालीय जाणीव ; नेत्रदान करणार

ong>बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनचा आगामी काबिल हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणारा आहे. या चित्रपटात तो अंध व्यक्तीची भूमिका साकारताना दिसणार आहे. अंधाचे जीवन कसे असते याची प्रचिती त्याला आली असेल त्याने घेतलेल्या एका निर्णयामुळे समजता येते. हृतिक रोशनने आपले डोळे दान करण्याचा संकल्प सोेडला आहे. 

हृतिक रोशन सध्या काबिल या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याने साकारलेल्या अंध व्यक्तीच्या भूमिकेसाठी चांगलाच अभ्यास केला होता, शिवाय प्रशिक्षणही घेतले होते. या चित्रपटासाठी त्याने अनेक नेत्रहिन व्यक्तींच्या मुलाखती घेऊन त्याच्या दैनंदिन जीवनाची माहिती घेतली होती. सोबतच त्यांना जाणविणाºया अडचणी त्याने समजून घेतल्या होत्या.

 एका मुलाखती दरम्यान हृतिकला अंधांचे जीवन नेत्रदानाबद्दल विचारले त्यावर तो म्हणाला, मी खूप वर्षांआधी टीव्हीवर ऐश्वर्या राय हिची नेत्रदानावरील जाहिरात पाहिली होती. तेव्हा माझ्या मनात एखाद्या व्यक्तीला आपले डोळे देणे हा विचार किती सुंदर आहे हे जाणविले होते. तेव्हाचा मी आपले डोळे दान करण्याचा विचार केला होता. सध्या मी या बद्दल विचार करतो आहो. काबिल या चित्रपटाच्या माध्यमातून मला अंधाच्या अडचणी समजून घेता आल्या. डोळे नसल्याने काय त्रास होतो याची थोडी का असेना कल्पना मला आली. मी नेत्रदान केले तर एखाद्या व्यक्तीच्या जीवनात मी पुन्हा प्रकाश पेरू शकेल. ं िलवकर हे जाहीर क रणार आहे, असेही हृतिक रोशन म्हणाला. 

हृतिक रोशन व यामी गौतम यांची प्रमुख भूमिका असलेला काबिल हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित केला जाणार आहे. सध्या यामी व हृतिक दोघेही या चित्रपटाच्या प्रमोशनात व्यस्त आहेत. 

kabil

Web Title: Hrithik Roshan is aware of the problems of the blind; Eye donation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.