हृतिक रोशन आणि यामी गौतमी यांचा 'काबिल' सिनेमात आढळली ही मोठी चुक,अन्नु कपूर यांनीच आणली निदर्शनास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2017 14:31 IST2017-02-24T09:01:33+5:302017-02-24T14:31:33+5:30

सुपरस्टार अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री यामी गौतम यांच्या अभिनयाने नटलेला काबिल सिनेमा रसिकांच्या पसंतीस उतरला आहे. बॉक्स ऑफिसवर ...

Hrithik Roshan and Yami Gautami have found this big mistake in 'Kabil' movie, Annu Kapoor has brought the same | हृतिक रोशन आणि यामी गौतमी यांचा 'काबिल' सिनेमात आढळली ही मोठी चुक,अन्नु कपूर यांनीच आणली निदर्शनास

हृतिक रोशन आणि यामी गौतमी यांचा 'काबिल' सिनेमात आढळली ही मोठी चुक,अन्नु कपूर यांनीच आणली निदर्शनास

परस्टार अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री यामी गौतम यांच्या अभिनयाने नटलेला काबिल सिनेमा रसिकांच्या पसंतीस उतरला आहे. बॉक्स ऑफिसवर सिनेमाने चांगले यश मिळवले आहे. हृतिक आणि यामीचा अभिनय तसंच सिनेमाची कथा यामुळे सिनेमाने रसिकांवर जादू करत कोटींची कमाई केली आहे. हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येऊन आता महिना उलटला आहे. अनेक रसिकांनी हा सिनेमा पाहिला आहे. मात्र या सिनेमात अशी एक बाब आहे की जी कुणाच्याही लक्षात आली नाही. काबिल सिनेमात एक अशी चूक होती जिच्याकडे कुणाचंही लक्ष गेले नाही. मात्र काबिलचे दिग्दर्शक खुद्द संजय गुप्ता यांनी सिनेमातील या चुकीचा खुलासा केला आहे. अन्नू कपूर यांचा प्रसिद्ध शो सुहाना सफर विद अन्नू कपूरमध्ये संजय गुप्ता यांनी याची माहिती दिलीय.
 
काबिल सिनेमात हृतिक रोशनने अंध व्यक्तीची भूमिका साकारली आहे. काही वाचण्यासाठी हृतिक ब्रेलचा वापर करत असल्याचे सिनेमात दाखवण्यात आले आहे. मात्र या सिनेमात हृतिककडे स्मार्ट फोन असल्याचे दाखवण्यात आले आहे. या सिनेमात हृतिकचे लग्न अंध असलेल्या यामीशी होतं. लग्नानंतर दोघंही आपल्या शेजा-यांसोबत असतात. त्यावेळी हृतिक आपला फोन सेल्फी घेण्यासाठी एका शेजा-याकडे देतो. त्यावेळी सेल्फी काढण्यासाठी सगळ्यांसोबत हृतिक आणि यामीसुद्धा कॅमे-याकडे पाहत पोज देतात. हीच या सिनेमातील सगळ्यात मोठी चूक होती असे संजय गुप्ता यांनी अन्नू कपूर यांच्या शोमध्ये मान्य केले आहे. हृतिक एक प्रसिद्ध अभिनेता आहे. आपल्या भूमिकेवर तो बरीच मेहनतही घेतो. त्यामुळे अभिनेता-अभिनेत्री म्हणून हृतिकसह यामीचीही जबाबदारी होती की या छोट्याशा गोष्टीकडे लक्ष द्यावे. मात्र तसे झाले नाही आणि त्यामुळे हा सीन चुकीच्या पद्धतीने रसिकांसमोर आला.
 
काबिल सिनेमाची कथा ही अंध दाम्पत्याच्या अवतीभोवती फिरणारी आहे. शांततेने आणि आनंदी जीवन जगणं हेच त्यांचं उद्दिष्ट असते. मात्र काही समाजकंटक त्यांच्यावर अन्याय करतात. त्यामुळे सिनेमात रोहनची भूमिका साकारणारा हृतिक आपली प्रेयसी अर्थात यामीच्या हत्येचा बदला घेतो. त्यासाठी अंध असलेला रोहन स्वतःला सज्ज करतो आणि शत्रूशी लढून यामीच्या हत्येचा बदला घेतो असे या सिनेमाचे कथानक आहे.
 
या सिनेमात एखाद्या नायकाने करायच्या सगळ्या गोष्टी हृतिकने रुपेरी पडद्यावर साकारल्या आहेत. त्यामुळे सिनेमात अखेरपर्यंत रसिकांना खिळवून ठेवण्यात त्याला यश येते. दिग्दर्शक संजय गुप्तानेही या सिनेमातील सगळेच सीन मोठ्या खुबीने साकारले आहेत. ते पाहताना तुम्हाला त्यात काहीच चुकीचे वाटणार नाही. मात्र एक चूक होती की ज्याकडे ना संजय गुप्तांचं लक्ष गेले नाही सुपरस्टार हृतिकचे. 

Web Title: Hrithik Roshan and Yami Gautami have found this big mistake in 'Kabil' movie, Annu Kapoor has brought the same

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.