हृतिक रोशनची ही अभिनेत्री पहिल्यांदाच झळकणार जॉन अब्राहमसोबत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2019 07:15 IST2019-08-03T07:15:00+5:302019-08-03T07:15:00+5:30
‘सुपर ३०’ चित्रपटात हृतिक रोशनसोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री मृणाल ठाकूर आता लवकरच ‘बाटला हाऊस’मध्ये अभिनेता जॉन अब्राहमसोबत पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

हृतिक रोशनची ही अभिनेत्री पहिल्यांदाच झळकणार जॉन अब्राहमसोबत
‘सुपर ३०’ चित्रपटात हृतिक रोशनसोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री मृणाल ठाकूर आता लवकरच ‘बाटला हाऊस’मध्ये अभिनेता जॉन अब्राहमसोबत पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे शूटिंग मसूरी येथे करण्यात आले. या चित्रपटाच्या निमित्ताने जॉनसोबत स्क्रिन शेअर करायला मिळाली, यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजते, असे मृणाल ठाकूर सांगते.
अभिनेता जॉन अब्राहमसोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल मृणाल सांगते,‘जॉन हा कामाप्रती अतिशय प्रामाणिक, मेहनती असा अभिनेता आहे. त्याच्यासोबत काम करायला मिळण्यासाठी तुमचं नशीब असलं पाहिजे, असे मला वाटते.’ ‘रूला दिया’ या गाण्याबाबत बोलताना ती म्हणते,‘ हे गाणं लोकांना आवडत आहे, याचा अर्थ दिग्दर्शकांनी आमच्याकडून तसे काम करवून घेतले आहे. त्यांना जसे पाहिजे तशा प्रकारे कथेची रचना त्यांनी केली आहे. ’
अभिनेत्री मृणाल ठाकूर सांगते,‘खरं सांगू तर, मी आज जी आहे ती केवळ प्रेक्षकांमुळेच. त्यामुळे माझी जबाबदारी आहे की, मी त्यांना नेहमी वेगवेगळया रूपात भूमिका साकारून स्वत:ला सिद्ध केले पाहिजे. त्यांच्या प्रेमाला मी न्याय द्यायला हवा. मी या गोष्टीचा नेहमी प्रयत्न करत असते. मला विविधांगी भूमिकांची आॅफर मिळत आहे, यातच माझे नशीब सामावलेले आहे.’
‘बाटला हाऊस’ हा चित्रपट १५ आॅगस्ट रोजी प्रदर्शित होणार असून चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार, दिव्या खोसला कुमार, कृष्णा कुमार मोनिशा अडवाणी, मधू भोजवानी, जॉन अब्राहम आणि संदीप लेझेल हे आहेत.