ऋतिक, आशुतोषविरोधात पोलीस तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2016 01:07 IST2016-02-20T08:07:24+5:302016-02-20T01:07:24+5:30

नवोदित लेखक आणि निर्माते आकाशदित्य लामा यांनी ‘मोहनजो दाडो‘ या चित्रपटाची कल्पना चोरल्याप्रकरणी दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, निर्माते सिद्धार्थ रॉय ...

Hrithik, Ashutosh police complaint | ऋतिक, आशुतोषविरोधात पोलीस तक्रार

ऋतिक, आशुतोषविरोधात पोलीस तक्रार

ong>नवोदित लेखक आणि निर्माते आकाशदित्य लामा यांनी ‘मोहनजो दाडो‘ या चित्रपटाची कल्पना चोरल्याप्रकरणी दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, निर्माते सिद्धार्थ रॉय कपूर आणि अभिनेता ऋतिक रोशन यांच्याविरोधात ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. 



‘‘या प्रकरणातील सर्व पुरावे मी पोलिसांकडे सोपवले आहेत. त्यानुसार आता तपास केला जाईल. या प्रकरणाची सत्यता पटल्यास तिघांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात येईल.’’ जानेवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात मी या प्रकरणाची तक्रार दिली होती. मोहनजो दारो प्रकरणात कोर्टाबाहेर तडजोड करण्यासाठी मला अद्याप कुणीही पुढे आलेले नाही. चित्रपटाच्या निर्मितीवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी ३८ वर्षीय आकाशदित्य लामा यांनी केली.



 ऋतिकच्या पायाला दुखापत झाली असून सध्या तो विश्रांती घेत आहे. पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तो पुन्हा पडद्यावर येणार आहे.

Web Title: Hrithik, Ashutosh police complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.