'धूम ४'मध्ये <br>हृतिक-अमिताभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 06:54 IST2016-01-16T01:17:40+5:302016-02-07T06:54:00+5:30

य शराज बॅनरच्या 'धूम'च्या सिरिजला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. सध्या 'धूम ४' च्या तयारीला मोठय़ा उत्साहात सुरूवात झाल्याचे ...

Hrithik-Amitabh in 'Dhoom 4' | 'धूम ४'मध्ये <br>हृतिक-अमिताभ

'धूम ४'मध्ये <br>हृतिक-अमिताभ

शराज बॅनरच्या 'धूम'च्या सिरिजला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. सध्या 'धूम ४' च्या तयारीला मोठय़ा उत्साहात सुरूवात झाल्याचे बोलले जाते. याद्वारे हृतिक रोशनची 'धूम' सिरिजमध्ये धमाकेदार पुनरागमन होण्याची चिन्हे दिसत आहेत. एवढेच नाही तर त्याच्या सोबत दस्तुरखुद्द अमिताभही दिसण्याची शक्यता आहे. 'धूम २' मध्ये हृतिक ने व्हिलनची भूमिका मोठय़ा ताकदीने साकारली होती. तसेतर यामध्ये कोणत्यातरी एका खानाची वर्णी लागण्याची चर्चा सुरू होती पण तसे झाले नाही. हृतिक पुन्हा एकदा व्हिलनच्या भूमिकेत तर अभिषेक पोलीसच्या भूमिकेत दिसणार आहेत. याद्वारे पिता-पुत्र एकमेकांसमोर उभे ठाकणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

Web Title: Hrithik-Amitabh in 'Dhoom 4'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.