तर या व्यक्तीमुळे मनीषा कोईराला आणि ऐश्वर्या राय बच्चन झाले होते कडक्याचे भांडण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2017 17:23 IST2017-10-10T11:53:04+5:302017-10-10T17:23:04+5:30
मॉडलिंगच्या जगातील राजीव मूलचंदानी हे नाव खूपच प्रसिद्ध आहे. मूलचंदानी 1990च्या दशकातील प्रसिद्ध मॉडेल होते. जर एखाद्या व्यक्तीला मॉडलिंगमध्ये ...

तर या व्यक्तीमुळे मनीषा कोईराला आणि ऐश्वर्या राय बच्चन झाले होते कडक्याचे भांडण
म डलिंगच्या जगातील राजीव मूलचंदानी हे नाव खूपच प्रसिद्ध आहे. मूलचंदानी 1990च्या दशकातील प्रसिद्ध मॉडेल होते. जर एखाद्या व्यक्तीला मॉडलिंगमध्ये आपले करिअर करायचे असेल तर तो मूलचंदानी यांचा सपोर्ट तो जरुर घ्यायचा. मनीषा कोईराला आणि ऐश्वर्या राय बच्चन या दोघी ही राजीवच्या गर्लफ्रेंड होत्या. करिअरच्या सुरुवातीलाच ऐश्वर्या रायचा राजीव मूलचंदानीशी अफेअर होते. 1994 साली मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर ऐश्वर्याला चित्रपटांच्या ऑफर्स येण्याची सुरुवात झाली. ऐश्वर्या पण मॉडलिंग पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये रस घेऊ लागली. जीन्स आणि प्यार हो गया हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाल्यानंतर ऐश्वर्यावर फ्लॉप अभिनेत्रीचा टॅग लागला होता. त्यावेळी मनीषा कोईराला यशाचा शिखरावर होती. मनीषा त्यावेळी एका मागोमाग एक हिट चित्रपट देत होती. याच दरम्यान राजीव मूलचंदानीचे नाव मनीषा कोईरालासोबत जोडले गेले. मनीषाने स्वत: एका इंटरव्ह्यु दरम्यान मूलचंदानी आणि ती एकमेकांच्या खूप जवळ असल्याचे सांगितले होते. त्यावेळी ऐश्वर्या सलमान खानसोबत हम दिल दे चुके सनमची शूटिंग करत होती.
मनीषासोबत मूलचंदानीची वाढती जवळीक बघून ऐश्वर्या नाराज झाली होती आणि तिने सलमान खानशी जवळीकता वाढवण्यास सुरुवात केली. एका पार्टीमध्ये ऐश्वर्या आणि मनीषाचे मूलचंदानीवरुन भांडण झाले होते.
ALSO RAED : आजी जया बच्चन यांच्यासोबत कधीच का दिसत नाही आराध्या बच्चन?
सध्या ऐश्वर्या फन्ने खानच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात ऐश्वर्या आपल्या पेक्षा वयाने 10 वर्ष लहान असलेल्या अभिनेत्यासोबत रोमांस करणार आहे. मात्र यात राजकुमार सोबत इंटिमेट सीन्स देण्यास ऐश्वर्याने नकार दिला आहे. कारण ऐ दिल है मुश्किलमध्ये ऐश्वर्याने रणबीर कपूरसोबत इंटिमेट सीन्स दिले होते. त्याची बरीच चर्चा झाली. हा चित्रपट ऐश्वर्याच्या इंटिमेट सीन्समुळे बच्चन कुटुंबीयांनी पाहिला सुद्धा नव्हता. फन्ने खानमध्ये तब्बल 17 वर्षानंतर अनिल कपूर आणि ऐश्वर्या राय मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. 'हमारा दिल आपके पास' हा दोघांचा चित्रपट हिट गेला होता. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.