सोनाक्षी सिन्हाला अशी मिळाली होती बॉलिवूडमध्ये एंट्री, सलमान खानने कामाच्या बदल्यात केली होती ही मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 16:30 IST2020-06-02T16:24:20+5:302020-06-02T16:30:23+5:30
जेव्हा सोनाक्षी तिच्या फिल्मी करिअरला घेऊन चिंतेत होती.

सोनाक्षी सिन्हाला अशी मिळाली होती बॉलिवूडमध्ये एंट्री, सलमान खानने कामाच्या बदल्यात केली होती ही मागणी
सोनाक्षी सिन्हा आज आपला वाढदिवस साजरा करते आहे. सोनाक्षीने 10 वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली होती. सोनाक्षीने 2010मध्ये आलेल्या दबंग सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. त्यावेळी सोनाक्षी सिन्हाचे वजन ऐवढे जास्त होते की कास्टिंग डिरेक्टरपासून ते दिग्दर्शकापर्यंत सिनेमात घेण्यासाठी फारसे कुणी तयार नव्हते.
जेव्हा सोनाक्षी तिच्या फिल्मी करिअरला घेऊन चिंतेत होती, तेव्हा सलमान खानने तिला साथ दिली होती. सलमानने तिला बोलावले आणि म्हणाला, “मी तुला माझा चित्रपट घेईन, पण यासाठी तुम्हाला आधी वजन कमी करावे लागेल. सोनाक्षी सांगते की ती त्यावेळी खूप खायची, खाण्यावर बंदी घालणे तिच्यासाठी खूप वेदनादायी होते.
सलमान खानने इतका विश्वास ठेवल्यानंतर आणि सोनाक्षीने रात्रंदिवस कठोर परिश्रम घेणे सुरु केले. मेहनत घेऊन सोनाक्षीने वजन कमी केले.काही महिन्यांतच ती पुन्हा सलमानला पुन्हा भेटली आणि सलमानने तिला आपल्या चित्रपटाचा एक भाग बनवण्याचा निर्णय घेतला. सलमानने सोनाक्षीला दबंगमध्ये काम देण्याच्या बदल्यात ट्रिट मागितली.
सोनाक्षी सिन्हा म्हणाली त्यादिवशी तिच्याकडे पैसे नव्हते. सलमानने ट्रीट मागितली म्हणून तिने जवळचे पैसे मोजायला घेतले तेव्हा तिच्याकडे ऐकूण तीन हजार रुपये होते. तीन हजार रुपयांत सलमानला ट्रिट कशी द्यायची असा प्रश्न सोनाक्षीला पडला म्हणून सोनाक्षीने ट्रिट पुढे ढकलली. हळुहळु वेळ पुढे निघून गेली आणि दोघे कलाकार आपल्या कामात व्यस्त झाले. सोनाक्षीला आजही त्या गोष्टीचा पाश्चात्याप होतो की तिने सलमानला ट्रिट का नाही दिली.