VIDEO : कोरोनाच्या भीतीने 'राधे'चं शूटींग कसं करतोय बघा सलमान खान, दिशासोबत गाणं होतंय शूट....

By अमित इंगोले | Updated: October 9, 2020 14:21 IST2020-10-09T14:21:02+5:302020-10-09T14:21:10+5:30

काही दिवसांपूर्वीच सलमान खान याने एक फोटो शेअर करून सांगितले होते की, राधे सिनेमाचं शूटींग सुरू झालं आहे.

How Salman Khan, Disha Patani and Jackie Shroff are shooting for Radhe your most wanted bhai amid-coronavirus | VIDEO : कोरोनाच्या भीतीने 'राधे'चं शूटींग कसं करतोय बघा सलमान खान, दिशासोबत गाणं होतंय शूट....

VIDEO : कोरोनाच्या भीतीने 'राधे'चं शूटींग कसं करतोय बघा सलमान खान, दिशासोबत गाणं होतंय शूट....

सलमान खान, दिशा पटानी, रणदीप हुड्डा आणि जॅकी श्रॉफसारख्या दिग्गज कलाकारांच्या भूमिका असलेल्या राधे - युअर मोस्ट वॉन्टेड भाई' चं शूटींग जवळपास ७ महिन्यांनंतर पुन्हा सुरू झालंय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या सिनेमाचं १० दिवसांचं शूटींग शिल्लक होतं. ज्यात एक गाणं आणि क्लायमॅक्स शूट करणार आहे. सध्या सलमान खान आणि दिशाच्या एका गाण्याचं शूटींग लोणावळ्यात सुरू आहे. 

काही दिवसांपूर्वीच सलमान खान याने एक फोटो शेअर करून सांगितले होते की, राधे सिनेमाचं शूटींग सुरू झालं आहे. आता सलमानने बिहाइंड द सीन व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात दाखवण्यात आलं आहे की, कोरोना व्हायरसमुळे सेटवर कशाप्रकारे काळजी घेतली जात आहे. व्हिडीओत सिनेमाचा सेट दाखवण्यात आलाय. तर या व्हिडीओला अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा व्हॉइस ओव्हर देण्यात आला आहे. (बाबो ! सलमान खानच्या 'या' जॅकेटची किंमत वाचून सुटेल तुम्हाला घाम)

या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, कशाप्रकारे सेट सॅनिटाइझ केला जातो आणि कशाप्रकारे लोकांनाही सॅनिटाइझ केलं जातंय. व्हिडीओत लोकांना सोशल डिस्टंसिंगचं पालन करताना बघता येऊ शकतं. या व्हिडिओत सलमान आणि दिशाच्या गाण्याच्या शूटींगची एक झलकही बघायला मिळते. (VIDEO : सलमानने शूटींगदरम्यान केलं असं काही की कतरिनाने दाबला त्याचा गळा!)

या सिनेमाचं दिग्दर्शन प्रभुदेवा करत आहे. हा सिनेमा ईदला रिलीज होणार होता. पण कोरोना व्हायरसमुळे शूटींग थांबवण्यात आलं होतं. त्यानंतर थिएटरही बंद झाले होते. आता शूटींग पुन्हा सुरू झालं आहे. पण सध्याच सिनेमाची रिलीज डेट जाहीर केलेली नाही. 
 

Web Title: How Salman Khan, Disha Patani and Jackie Shroff are shooting for Radhe your most wanted bhai amid-coronavirus