हार्ट अटॅकनंतर किती बदललं श्रेयस तळपदेचं आयुष्य?, अभिनेता म्हणाला - "आता कुटुंबाचं..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 19:04 IST2024-04-19T18:57:57+5:302024-04-19T19:04:46+5:30
Shreyas Talpade: मागील वर्षी श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर आता त्याच्या आयुष्यात किती बदल झालाय, याबद्दल त्याने खुलासा केला आहे.

हार्ट अटॅकनंतर किती बदललं श्रेयस तळपदेचं आयुष्य?, अभिनेता म्हणाला - "आता कुटुंबाचं..."
अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) बॉलिवूडमधील प्रतिभावान आणि अष्टपैलू कलाकारांपैकी एक आहे. त्याने ओम शांती ओम, इकबाल, गोलमाल फ्रंचायजीसारख्या चित्रपटात काम केले आहे. त्याच्यासाठी २०२३ हे वर्ष खूप खडतर गेले होते. खरेतर त्याला १४ डिसेंबर, २०२३ला हार्ट अटॅक आला होता. हे समजल्यावर त्याच्या चाहत्यांना देखील धक्का बसला होता. यानंतर त्याच्या आयुष्यातही खूप मोठा बदल झाला आहे. एका मुलाखतीत श्रेयसने खुलासा केला आहे.
पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत श्रेयस तळपदेने हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्याच्या आयुष्यात कसा बदल झाला, याबद्दल सांगितले. तो म्हणाला की, आता मी जास्त रिलॅक्स आणि शांत झालोय. या जीवन बदलणाऱ्या अनुभवामुळे माझे लक्ष त्याच्या करिअरमधून त्याचे आरोग्य आणि कुटुंबाकडे, विशेषत: त्याच्या मुलीकडे वळले आहे. श्रेयसने सांगितले की, या घटनेपासून त्याचे तिच्यासोबतचे नाते अधिक घट्ट झाले आहे आणि तिच्यासोबत जास्त वेळ व्यतित करतो. आम्ही अजून जवळ आलो आहोत. हे मला सर्वात जास्त आनंदित करते.
अभिनेता आता कौटुंबिक क्षणांना देतोय महत्त्व
त्याने स्पष्ट केले की त्याने याआधी आपला बहुतेक वेळ "घोड्याप्रमाणे धावण्यात" कसा घालवला आणि सर्वोत्तम संधी शोधत, आपली कारकीर्द पुढे नेण्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले होते. मात्र तब्येत बिघल्यानंतर अभिनेत्याला कौटुंबिक क्षण आणि त्यांच्यासोबत जास्त वेळ व्यतित केला पाहिजे आणि बंध जपण्याचे महत्त्व लक्षात आले. त्याने भूतकाळात आपल्या कुटुंबाला कसे गृहीत धरले होते आणि ते सुंदर क्षण गमावले, ज्यांना तो आता खूप महत्त्व देतो, असे सांगितले.
वर्कफ्रंट
आव्हानांचा सामना करूनही श्रेयस तळपदे सिनेइंडस्ट्रीत सक्रिय आहे. श्रेयस आता 'वेलकम टू द जंगल' या मल्टीस्टारर चित्रपट वेलकम फिल्म सिरीजच्या तिसऱ्या भागात दिसणार आहे. तसेच त्याचा ‘लव्ह यू शंकर’ हा चित्रपट १९ एप्रिलला प्रदर्शित झाला आहे.