५० अभिनेत्रींचे लैंगिक शोषण करणाऱ्या हार्वे वाइनस्टाइनसोबत फराह खान काय करत असेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 14:08 IST2017-11-08T08:32:04+5:302017-11-08T14:08:28+5:30

हॉलिवूड प्रोड्यूसर हार्वे वाइनस्टाइन याच्यावर हॉलिवूडमधील अनेक दिग्गज अभिनेत्रींनी लैंगिक शोषणाचे आरोप लावले आहेत. आतापर्यंत ५० पेक्षा अधिक अभिनेत्रींनी ...

How Farah Khan is doing with Harvey Winsteen, who is sexually assaulting 50 actresses? | ५० अभिनेत्रींचे लैंगिक शोषण करणाऱ्या हार्वे वाइनस्टाइनसोबत फराह खान काय करत असेल?

५० अभिनेत्रींचे लैंगिक शोषण करणाऱ्या हार्वे वाइनस्टाइनसोबत फराह खान काय करत असेल?

लिवूड प्रोड्यूसर हार्वे वाइनस्टाइन याच्यावर हॉलिवूडमधील अनेक दिग्गज अभिनेत्रींनी लैंगिक शोषणाचे आरोप लावले आहेत. आतापर्यंत ५० पेक्षा अधिक अभिनेत्रींनी दावा केला की, हार्वेनी त्यांचे लैगिक शोषण केले. यामध्ये अ‍ॅँजेलिना जोली, ग्वानेथ पाल्त्रो या बड्या अभिनेत्रींच्याही नावांचा समावेश आहे. त्यामुळे हॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अशात हा वाद सुरू असताना बॉलिवूड दिग्दर्शक तथा कोरिओग्राफर फराह खान हिने तिच्या ट्विटर हॅण्डलवरून वाइनस्टाइनसोबतचा एक फोटो पोस्ट करून या वादात एक प्रकारची उडी घेतली आहे. वास्तविक हा फोटो जुना असून, ‘मै हूं ना’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा आहे. हा फोटो शेअर करताना फराहने लिहिले की, ‘सापडला... सर्व थ्राबॅकची थ्राबॅक आहे. मी हार्वे वाइनस्टाइनला बॉलिवूडमधील ज्ञान देत आहे. ‘मै हूं ना च्या सेटवर...’ फराहने शेअर केलेल्या या फोटोमधून तिला नेमके काय सांगायचे हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. 

जेव्हा आम्ही याबाबतची माहिती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा फराह खानने हा फोटो फनी मुडमध्ये पोस्ट केल्याचे समोर आले. खरं तर बॉलिवूडने यापूर्वीच लैंगिक शोषण आणि अभिनेत्रींबरोबरच्या दुर्व्यवहाराविरोधात आवाज उठविला आहे. प्रियंका चोपडा, दिया मिर्झा आणि विद्या बालनसारख्या अभिनेत्रींनी याविरोधात त्यांचा आवाज बुलंद केला आहे. खरं तर इंडस्ट्रीमध्ये तरुणींचे शोषण ही बाब काही नवी नाही. यापूर्वीही असे बरेचसे प्रकार समोर आले आहेत.  
 }}}} ">Found this!! Throwback of all throwbacks! Me giving Bollywood gyaan to Harvey Weinstein!! #beforetheshithitthefan#mainhoonna shoot pic.twitter.com/LYH2sgjmaV— Farah Khan (@TheFarahKhan) November 8, 2017
आता तर बॉलिवूडमध्ये हार्वे वाइनस्टाइनसारख्या लोकांचा पर्दाफाश करण्याची तयारी केली जात आहे. कारण वाइनस्टाइन सेक्स प्रकरणावर अभिनेत्री दिया मिर्झा हिने ज्या पद्धतीने तिचे अनुभव शेअर केले, त्यावरून बॉलिवूडही आता अशा प्रवृत्तीविरोधात बंड पुकारण्याची शक्यता आहे. दिया मिर्झाने म्हटले होते की, ‘मी फिल्म इंडस्ट्रीत काम करण्यासाठी कोणाच्याही विनवण्या केल्या नाहीत. मला तर बºयाचशा दिग्दर्शकांनी बोअरिंग असे म्हटले, परंतु मी माझ्या मर्यादा कधीही ओलांडल्या नाहीत. स्वत:च्या हिमतीवर मी माझे करिअर बनविले.’ 

Web Title: How Farah Khan is doing with Harvey Winsteen, who is sexually assaulting 50 actresses?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.