आई झाल्यावर दीपिका पादुकोणचं आयुष्य कसं बदललं? लेक 'दुआ'च्या सांगितल्या खास गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 14:47 IST2026-02-02T14:43:52+5:302026-02-02T14:47:08+5:30

बॉलिवूडची 'मस्तानी' लेक 'दुआ'साठी गाते बालगीते, म्हणाली...

How did Deepika Padukone's life change after becoming a mother? Special things told by her daughter 'Dua' | आई झाल्यावर दीपिका पादुकोणचं आयुष्य कसं बदललं? लेक 'दुआ'च्या सांगितल्या खास गोष्टी

आई झाल्यावर दीपिका पादुकोणचं आयुष्य कसं बदललं? लेक 'दुआ'च्या सांगितल्या खास गोष्टी

बॉलिवूडची 'मस्तानी' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे दीपिका पादुकोण. आपल्या साधेपणाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना मोहवणारी दीपिका सध्या आपल्या मातृत्वाचा आनंद लुटत आहे. मुलगी दुआ हिच्या जन्मानंतर दीपिकाचे आयुष्य पूर्णपणे बदललं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दीपिकाने एक आई म्हणून तिचे काही खास आनंदाचे क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

'हार्पर बाजार इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत दीपिकाने एक अतिशय मजेशीर किस्सा सांगितला. ती म्हणाली, "सध्या माझी मुलगी 'दुआ' हीच माझी सर्वात मोठी आवडती आहे. एकदा माझ्या बॅगेत मला दोन दिवसांपूर्वीचा थेपल्याचा तुकडा सापडला, जो दुआ खात होती".

दीपिकाने सांगितले की, ती आपल्या मुलीसोबत तासनतास वेळ घालवते. ती दुआला सतत "आय लव्ह यू" म्हणत असते. इतकंच नाही तर, लेकीचं मनोरंजन करण्यासाठी दीपिका चक्क लहान मुलांची 'हेड, शोल्डर, नीज अ‍ॅण्ड टोज' सारखी गाणीही विनोदी पद्धतीने गाते. या लहान लहान गोष्टींमुळे दोघींचं नातं अधिक घट्ट होत असल्याचं दीपिकानं सांगितलं.


नोव्हेंबर २०१८ मध्ये रणवीर सिंग आणि दीपिकाने लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या सहा वर्षांनंतर, २०२४ मध्ये त्यांच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं. गेल्या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर या जोडप्याने आपल्या मुलीचं नाव 'दुआ' असल्याचं जाहीर करत तिचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.
 

Web Title : दीपिका पादुकोण का जीवन बेटी दुआ के बाद बदला।

Web Summary : दीपिका पादुकोण ने बेटी दुआ के जन्म के बाद मातृत्व के सुखद अनुभव साझा किए। वह दुआ के साथ घंटों बिताती हैं, गाने गाती हैं, और हर पल को संजोती हैं, जिससे उनका बंधन मजबूत होता है। दीपिका ने दुआ द्वारा पुराने थेपला खाने की एक मजेदार घटना का खुलासा किया।

Web Title : Deepika Padukone's life changed after becoming a mother to Dua.

Web Summary : Deepika Padukone shares her joyful motherhood experience after daughter Dua's birth. She spends hours with Dua, sings songs, and cherishes every moment, strengthening their bond. Deepika revealed a funny incident about Dua eating an old thepla.